PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 06 NOV 2020 7:50PM by PIB Mumbai

Coat of arms of India PNG images free download  

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

दिल्ली-मुंबई, 6 नोव्हेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधल्या हजिरा येथील रो-पॅक्स टर्मिनलचे दि. 8 नोव्हेंबर, 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता उद्घाटन करणार आहेत.  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी ते हजिरा ते घोघा रो-पॅक्स फेरी सेवेला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. पंतप्रधानाच्या दूरदृष्टीनुसार देशाच्या आर्थिक विकासासाठी जलमार्गांचा वापर करण्यासाठी या योजनेचे केलेले काम म्हणजे एक महत्वाचे आणि मोठे पाऊल आहे. याप्रसंगी पंतप्रधान जलमार्ग सेवेच्या स्थानिक वापरकर्त्यांबरोबर संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री आणि गुजरातचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

 

आयआयटी-म्हणजेच भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्लीच्या 51 व्या दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील. येत्या 7 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता होणाऱ्या या समारंभात ते विद्यार्थी आणि उपस्थितांशी संवाद साधतील. केंद्रीय शिक्षण मंत्री आणि शिक्षण राज्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली व्हर्च्युअल जागतिक गुंतवणूकदार गोलमेज परिषद पार पडली. गोलमेजला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, या वर्षभरात भारताने धैर्याने  महामारीचा सामना केला तेव्हा जगाने भारताचे राष्ट्रीय चरित्र आणि भारताचे खरे सामर्थ्य  पाहिले.  ते म्हणाले की, महामारीने  जबाबदारीची भावना, करुणेची भावना, राष्ट्रीय एकता आणि नवसंशोधन या गुणांचे दर्शन घडवले ज्यासाठी भारतीय ओळखले जातात.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :

देशात गेल्या 24 तासांत कोरोनारुग्णांची संख्या  50,000 पेक्षा कमी आढळली आहे, तर याच काळात 54,000 पेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.गेल्या पाच आठवड्यांपासून भारतात, कोरोना संसर्गित रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने जास्त राहिले आहे.

गेल्या 24 तासात 54,157 कोविड रुग्ण उपचारानंतर बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले. तर याच काळात देशात 47,638 नवे रुग्ण आढळले आहेत.

गेल्या पाच आठवड्यांपासून देशात दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दररोज रुग्णांची सरासरी संख्या 73,000 पेक्षा अधिक असायची,मात्र आता ही संख्या सुमारे 46,000  रुग्णांपर्यंत कमी झाली आहे.

सक्रीय रुग्णांच्या संख्येतही सातत्याने घट होतांना दिसते आहे. सध्या एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 5,20,773 इतकी आहे, देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या तुलनेत सक्रीय रुग्णांचे प्रमाण केवळ 6.19% इतके आहे.

सक्रीय रूग्णांच्या संख्येत होत असलेल्या घसरणीमागे महत्वाचे कारण म्हणजे नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने अधिक आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आज 77,65,966 इतकी आहे. बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्ण यांच्यात सुमारे 72.5 लाखांचा (72,45,193) फरक आहे. यामुळे देशात रुग्ण बरे होण्याचा दर 92.32% इतका झाला आहे.

नव्याने बरे झालेल्या कोविड रुग्णांपैकी 80% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहे.

एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 11,000 रुग्ण बरे झाले आहेत.

तर नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी 79% टक्के रुग्ण देखील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 10,000 पेक्षा जास्त रुग्ण आढळले असून त्याखालोखाल केरळ मध्ये 9,000 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.

गेल्या 24 तासात देशभरात कोरोनामुळे 670  मृत्यू झाले. यापैकी 86% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.  तर त्यातही 38 टक्के मृत्यू (256) महाराष्ट्रात आणि त्यापाठोपाठ दिल्लीत सर्वाधिक (66) मृत्यू झाले आहेत.

 

इतर अपडेट्स:

 

महाराष्ट्र अपडेट्स:  

महाराष्ट्रात दैनंदिन कोविड रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. महाराष्ट्रात गुरुवारी 5,246 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. दिल्लीतील दैनंदिन रुग्णांच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे. मुंबईत 841 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या 16,116 इतकी आहे, जी राज्याच्या सक्रिय रुग्णांच्या प्रमाणात 1/6 इतकी आहे. कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर आगामी उत्सवाच्या काळाचे एक मोठे आव्हान उभे राहिले असून, महाराष्ट्र सरकारने दिवाळीसाठी आज मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. लोकांना फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे.

FACT CHECK

* * *

M.Chopade.S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1670767) Visitor Counter : 159