नागरी उड्डाण मंत्रालय
देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी वाजवी भाडे आकारण्यास 24 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ
Posted On:
05 NOV 2020 7:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2020
वाजवी भाडे मर्यादा, ज्याअंतर्गत विमान कंपन्यांना भाडे आकारावे लागत होते त्यास हवाई वाहतूक मंत्रालयाने 24 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. वाजवी भाडे मर्यादा 21 मे 2020 पासून लागू आहे.
दैनंदिन प्रवासी वाहतूक 1 नोव्हेंबर 2020 रोजी 2.05 लाखापर्यंत पोहचली आहे. मे 2020 मध्ये जेंव्हा देशातंर्गत विमानवाहतूक सुरू झाली तेंव्हा विमान कंपन्या नियमित क्षमतेच्या 33% पर्यंत उड्डाण करण्यास सक्षम होत्या (2020 उन्हाळी वेळापत्रकानुसार). त्याकाळात दैनंदिन प्रवासी वाहतूक 30,000 एवढी होती. 26 जून 2020 पासून 45% वाढ करण्यात आली. त्यानंतर 2 सप्टेंबर 2020 पासून मर्यादा 60% केली. सध्या विमानवाहतूक कंपन्या 60% क्षमतेने विमानवाहतूक करत आहेत.
हवाई वाहतूक मंत्रालय दररोज होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेऊन आहे आणि सणासुदीच्या काळात वाहतूक आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे आणि प्रवाशांची रहदारी वाढल्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये वाहतूकक्षमता 70-75% वाढवण्यात येईल.
M.Chopade/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1670404)
Visitor Counter : 201