सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

थावरचंद गहलोत यांनी आभासी व्यासपीठाच्या माध्यमातून उत्तर मुंबईतील दिव्यांगजनांना मदत साधने आणि उपकरणाच्या मोफत वितरणासाठी एडीआयपी शिबिराचे केले उद्‌घाटन


1035 लाभार्थीना पुढील 3 दिवसात 1740 मदत साधने आणि उपकरणे मिळणार

Posted On: 05 NOV 2020 7:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2020

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री  थावरचंद गहलोत यांनी ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रीमिंगच्या माध्यमातून उत्तर मुंबईतील दिव्यांगजनांना मदत साधने आणि  उपकरणाच्या मोफत वितरणासाठी एडीआयपी शिबिराचे उद्‌घाटन केले.  उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार  गोपाल शेट्टी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  कोविड -19 महामारीपासून बचाव करण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करत हे शिबिर उत्तर मुंबईतील कांदिवली इथल्या पोईसर जिमखाना येथे आयोजित करण्यात आले होते.

यावेळी बोलतांना गहलोत यांनी सर्व दिव्यांगजन आणि पोईसर  जिमखाना येथील कार्यक्रमाला उपस्थित इतरांना  तसेच जे लोक  ऑनलाईन वेबकास्टच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले, त्यांनाही शुभेच्छा दिल्या. दिव्यांगजनांसंदर्भात सरकारच्या कामगिरीबद्दल  बोलताना ते म्हणाले की, गेल्या सहा वर्षात अपंग व्यक्तींच्या सशक्तीकरण विभागाने (डीईपीडब्ल्यूडी) एडीआयपी योजनेंतर्गत 9265  वितरण शिबिरे आयोजित केली आहेत आणि याचे 16.70 लाख दिव्यांगजन लाभार्थी आहेत. त्यांनी माहिती दिली की कोविड-19 च्या  पार्श्वभूमीवर मंत्रालयाने सामाजिक अंतर आणि स्वच्छता प्रोटोकॉलचे पालन करणार्‍या प्रचलित अटींसह  वितरण शिबिरांना सुधारित प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) मंजूर केली आहे. उत्तर मुंबईचे खासदार  गोपाल शेट्टी यांनी खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून  33 मोटारयुक्त ट्रायसायकल उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. या मोटारयुक्त ट्रायसायकल  उत्तर मुंबईच्या निवडक दिव्यांगजनांना वितरित केल्या जातील.

आपल्या भाषणात गोपाल शेट्टी यांनी आपल्या मतदारसंघात हे वितरण शिबिर आयोजित करण्यासाठी  सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने दिलेल्या सहकार्याबद्दल थावरचंद गेहलोत यांचे आभार मानले आणि देशभरातील दृष्टिबाधितांना निवृत्तीवेतन देण्यासाठी तरतूद  किंवा योजना आखण्याची  विनंती केली.

जानेवारी आणि फेब्रुवारी 2020 महिन्यात उत्तर मुंबईच्या 06 ठिकाणी एकूण 1035 लाभार्थींची ओळख पटवण्यात आली. पुढील  3 दिवसांत उत्तर मुंबईतील दहिसर , कांदिवली (पश्चिम), कांदिवली (पूर्व), बोरीवली (पूर्व), बोरीवली (पश्चिम) आणि  पोईसर  जिमखाना येथील शिबिराच्या माध्यमातून या लाभार्थीना एकूण 1740 मदत आणि सहाय्यक उपकरणे टप्प्याटप्प्याने वितरित  करण्यात येतील .

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय (एमओएसजेई)च्या दिव्यांग व्यक्ती सशक्तीकरण विभागाच्या (डीईपीडब्ल्यूडी)अखत्यारीतील ,आर्टिफिशियल लिंब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (अलिम्को), कानपूर यांनी एडीआयपी योजनेअंतर्गत उत्तर मुंबई जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन  केले होते.  नवीन मंजूर प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) नुसार शिबीराचे आयोजन करण्यात आले .

शिबिरामध्ये 150 दिव्यांगजनाना  विविध प्रकारची मदत आणि सहाय्यक उपकरणे वितरित करण्यात आली ज्यामध्ये 21 मोटारयुक्त ट्रायसायकलचा समावेश होता. उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील खासदार  गोपाल शेट्टी यांच्या 3,96,000 रुपयांच्या एमपीएलएडी निधीतून एकूण  33 मोटरयुक्त ट्रायसायकल देण्यात येणार आहेत. एका ट्रायसायकलची किंमत 37000 रुपये  आहे. पात्र लाभार्थ्याला केंद्र  सरकारच्या एडीआयपी योजनेंतर्गत अनुदान म्हणून 25000 रुपये सहाय्य आणि उर्वरित 12000 रुपये प्रति ट्रायसायकल एमपीएलएडी निधीतून दिले जात आहेत.

मदत आणि सहाय्यक उपकरणांच्या वितरणा दरम्यान कोविड 19  चा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य आणि वैयक्तिक सुरक्षिततेचे कठोर पालन आणि इतर आवश्यक सावधगिरी बाळगण्यात आली. प्रत्येक व्यक्तीसाठी थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था, फेस मास्क, स्वच्छता , हातमोजे आणि व्यावसायिकांकडूंन पीपीई किटचा वापर बंधनकारक करण्यात आला.  वितरणाच्या नवीन एसओपीनुसार स्थळ आणि वारंवार स्पर्श केलेल्या परिसराची स्वच्छता देखील करण्यात आली. सहाय्यक उपकरणांची आणि वाहनांची  बहु-स्तरीय स्वच्छता, वितरणापूर्वीच करण्यात आली.

या कार्यक्रमात उपस्थित असणारे लाभार्थी आणि त्यांच्या मदतनीसांसाठी योग्य सामाजिक अंतर राखून आसन व्यवस्था  ठेवण्यात आली होती.  संपर्क टाळण्यासाठी विशिष्ट वेळेत एकावेळी  40 लाभार्थ्यांसाठी  स्वतंत्र प्रवेश आणि निर्गमन व्यवस्था केली होती. 

राज्य विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते  प्रविण दरेकरविजय (भाई) गिरकर, विधानपरिषद सदस्य ,  योगेश सागर, आमदार, चारकोप विधानसभा मतदारसंघ अतुल भातखळकर , आमदार कांदिवली विधानसभा मतदारसंघ मनिषा चौधरी, आमदार, दहिसर विधानसभा मतदारसंघ , सुनील राणे, आमदार, बोरिवली विधानसभा मतदारसंघ आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बीना ई. चक्रवर्ती, उपसचिव, डीईपीडब्ल्यूडी, लेफ्टनंट कर्नल पी. के दुबे (सेवानिवृत्त), महासंचालक , अलिम्को, डॉ. योगेश दुबे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि  उत्तर मुंबईचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1670407) Visitor Counter : 235