कोळसा मंत्रालय
भारत आणि इंडोनेशिया दरम्यान कोळशावरील 5 व्या संयुक्त कृती गटाची आभासी बैठक
प्रविष्टि तिथि:
05 NOV 2020 11:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2020
कोविड-19 महामारीमुळे प्रवासावरील निर्बंधामुळे नवी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भारत आणि इंडोनेशिया दरम्यान कोळशावरील 5 व्या संयुक्त कृती गटाचे (जेडब्ल्यूजी) भारताने यशस्वी आयोजन केले.

कोळसा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विनोद कुमार तिवारी आणि इंडोनेशियाचे ऊर्जा व खनिज संसाधने मंत्रालयाचे खनिज आणि कोळसा बिगर कर राज्य महसूल संचालक जॉन्सन पाकपहन यांनी या संयुक्त कृतिगटाचे सह-अध्यक्षपद भूषवले. तिवारी यांनी आपल्या प्रारंभिक भाषणात भारतातील कोळसा क्षेत्राचा आढावा घेऊन भविष्यासाठी उदयोन्मुख स्थितीबाबत सादरीकरण केले. त्यांनी आत्मनिर्भर भारत अंतर्गत कोळशामध्ये स्वयंपूर्णतेसाठी भारताने हाती घेतलेले उपक्रम आणि दोन्ही देशांतील कोळसा क्षेत्रातील व्यवसायांसाठी आवश्यक बाबी अधोरेखित केल्या.

कोळसा मंत्रालयाने भरतोय कोळसा धोरण सुधारणा, कोकिंग कोल अन्वेषण आणि वाणिज्यिक खनन या विषयावर सादरीकरण केले, त्यानंतर इंडोनेशियातील कोळसा धोरण व सध्याच्या कोळसा व्यवसायाच्या अद्यतनांविषयी सादरीकरण झाले. सीएमपीडीआयएल इंडिया आणि एमसीआरडीसी इंडोनेशियाने तांत्रिक बाबी सादर केल्या आणि उपलब्ध माहिती सामायिक करण्यात आली.
भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) आयोजित केलेल्या बी2बी सत्रामध्ये गुंतवणूकदारांच्या व्यापार समस्यांवर मोकळेपणाने चर्चा झाली. आणि समस्यांचे निराकरण करण्याची मागणी दोन्ही सरकारच्या वतीने करण्यात आली. संबंधित प्रतिनिधींनी दोन्ही देशांमधील उदयोन्मुख व्यवसायाच्या संधी अधोरेखित केल्या.
या मंचव्यतिरिक्तही चर्चा पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1670594)
आगंतुक पटल : 251