सांस्कृतिक मंत्रालय
कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने “संग्रहालये, आर्ट गॅलरी आणि प्रदर्शन पुन्हा उघडण्यासाठी” प्रमाणित कार्यप्रणाली जारी केली
Posted On:
05 NOV 2020 11:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2020
गृह मंत्रालयाच्या अनलॉक 5.0 मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे आणि संस्कृती आणि सर्जनशील उद्योगातील विविध हितधारकांकडून आलेल्या सूचना विचारात घेतल्यानंतर, सांस्कृतिक मंत्रालयाने “संग्रहालये, आर्ट गॅलरी आणि प्रदर्शन” पुन्हा सुरु करण्यासाठी विस्तृत प्रमाणित कार्यप्रणाली (SOP) जारी केली .
प्रतिबंधित क्षेत्रात कोणतीही संग्रहालये आणि / किंवा आर्ट गॅलरी पुन्हा उघडली जाणार नाहीत हे स्पष्ट केले आहे . तसेच राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकार त्यांच्या क्षेत्र मूल्यांकनानुसार अतिरिक्त उपाय प्रस्तावित करण्याबाबत विचार करू शकतात.
या मार्गदर्शक तत्त्वांचे संग्रहालये, आर्ट गॅलरी आणि प्रदर्शन (तात्पुरते आणि कायमचे दोन्ही) व्यवस्थापन आणि या ठिकाणांना भेट देणाऱ्या अभ्यागतांनी पालन करायचे आहे. पुरेशी स्वच्छता, तिकिटांची खरेदी व संग्रहालये, प्रदर्शन व कलादालनांमध्ये अभ्यागत आणि कर्मचार्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी व्यापक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
ही मार्गदर्शक तत्त्वे तत्काळ लागू राहतील आणि पुढील आदेश येईपर्यंत अंमलात असतील. सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत संग्रहालये, प्रदर्शन आणि कला दालने 10 नोव्हेंबर, 2020 नंतर पुन्हा उघडली जातील, तर इतर सोयीनुसार आणि संबंधित राज्य / शहर / स्थानिक कायदे, नियम आणि कायदे / अनलॉक मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने पुन्हा उघडली जातील.
सांस्कृतिक मंत्रालयाने “संग्रहालये, कला दालने आणि प्रदर्शन पुन्हा उघडण्यासाठी” जारी केलेली प्रमाणित कार्यप्रणाली पाहण्यासाठी येथे क्लिक करा
30 सप्टेंबर, 2020 रोजी गृह मंत्रालयाने अनलॉक मार्गदर्शक तत्त्वे 5.0 जारी केली. आणि ती सध्या लागू असून त्यांना 30 नोव्हेंबर, 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. सांस्कृतिक संस्थांच्या संदर्भात या मार्गदर्शक तत्त्वांचा संबंधित भाग खाली पुन्हा दिला आहे-
सिनेमा/थिएटर/मल्टीप्लेक्स यांना त्यांच्या क्षमतेच्या 50 टक्के आसन व्यवस्थेनुसार 15 ऑक्टोबर 2020 पासून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याविषयी प्रमाणित कार्यप्रणाली SOP माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून जारी केले जातील.
मनोरंजन पार्क्स आणि तत्सम जागा 15 ऑक्टोबर 2020 पासून सुरु करण्यास परवानगी, त्यासाठी प्रमाणित कार्यप्रणाली केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जारी केली जाईल.
उद्योग ते उद्योग (B2B) प्रदर्शन 15 ऑक्टोबर 2020 पासून सुरु करण्याची परवानगी, त्यासाठी प्रमाणित कार्यान्वयन प्रोटोकॉल (SOP) वाणिज्य मंत्रालयाकडून जारी केले जातील.
सामाजिक/शैक्षणिक/क्रीडा/मनोरंजन/सांस्कृतिक/धार्मिक/राजकीय कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमांसाठी यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्राबाहेर 100 व्यक्तींच्या जमावाला परवानगी दिली आहे. आता राज्य/केंद्रशासित प्रदेशांना अशा समारंभांसाठी 15 ऑक्टोबर 2020 नंतर प्रतिबंधित क्षेत्राबाहेर 100 पेक्षा अधिक व्यक्तींना मान्यता देण्याची परवानगी देण्यात आली आहे. जी खालील अटींसह असेल:
बंद जागेत सभागृह हॉल क्षमतेच्या कमाल 50% परवानगी दिली जाईल, ज्याची 200 लोकांची कमाल मर्यादा असेल. फेस मास्कचा वापर, योग्य अंतर राखणे, थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था आणि हात धुण्यासाठी सॅनिटायजरचा वापर अनिवार्य असेल.
खुल्या जागेत, मैदानाची जागा विचारात घेता/एकंदरीत जागा पाहता, योग्य अंतराची काटेकोर अंमलबजावणी, मास्कचा वापर अनिवार्य, थर्मल स्कॅनिंग आणि हात धुण्यासाठी सॅनिटायजरची व्यवस्था असेल.
अशा प्रकारच्या जमावातून कोविड-19 चा प्रसार होऊ नये, यासाठी राज्ये/ केंद्रशासित प्रदेश सविस्तर मानक संचालन प्रक्रिया (एसओपी) जारी करुन त्याची काटेकोर अंमलबजावणी करतील.
* * *
U.Ujgare/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1670597)
Visitor Counter : 236
Read this release in:
Telugu
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Kannada