दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
गोवा टपाल विभागाकडून ‘कोविड विरोधात लढण्यासाठी, “मानसिक आरोग्याचा सांभाळ” या विशेष कव्हर आणि शिक्क्याचे प्रकाशन
Posted On:
05 NOV 2020 7:47PM by PIB Mumbai
पणजी, 5 नोव्हेंबर 2020
गोवा टपाल विभागाकडून 09 नोव्हेंबर रोजी “कोविड विरोधात लढण्यासाठी, मानसिक आरोग्याचा सांभाळ” या विशेष कव्हर आणि शिक्क्याचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या विशेष कव्हर आणि शिक्क्याचे पुरस्कर्ते गोवा फिलाटेलिक आणि न्यूमिझमॅटिक सोसायटी आहे.
तसेच गोवा टपाल विभागाकडून 09 नोव्हेंबर रोजी “कोविड-19 विरोधात लढण्यासाठी संपर्क मागोव्यात सहयोग करा” या शिक्क्याचे प्रकाशन करण्यात येणार आहे. हा विशेष शिक्का पणजी मुख्यालय आणि मडगाव मुख्यालयातील सर्व साधनांवर लावला जाणार आहे. पणजी कार्यालयात 09/11/2020 ते 13/11/2020 आणि मडगाव कार्यालयात 17/11/2020 to 21/11/2020 या दरम्यान उपलब्ध असणार आहे. या विशेष शिक्क्यामुळे कोविड-19 चा आणखी प्रसार रोखण्यासाठी संपर्क मागोव्याबाबत जनजागृती होण्याची अपेक्षा आहे.
M.Chopade/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1670416)
Visitor Counter : 106