PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 28 SEP 2020 7:27PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 28 सप्टेंबर 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड येथे नमामी गंगे योजनेअंतर्गत सहा मेगा प्रकल्पांचे 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :

  • भारतातील कोरोनामुक्तांच्या एकूण संख्येने ओलांडला 50 लाखांचा महत्त्वपूर्ण टप्पा-भारतातील कोरोनामुक्त व्यक्तींच्या संख्येने आज 50 लाखांचा महत्त्वाचा टप्पा पार केला (50,16,520). कोविडमधून बरे होणाऱ्या रुग्णांची रोजची संख्या मोठी असल्याने, कोरोनामुक्त व्यक्तींची दररोज मोठ्या संख्येने नोंद करण्याचा भारताचा शिरस्ता कायम आहे. देशात गेल्या चोवीस तासांत 74,893 रुग्ण कोरोनातून बरे झाले असल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनामुक्तीचे प्रमाण अतिशय उच्च असून, एका दिवसात 90,000 पेक्षा अधिक रुग्ण बरे झाल्याची कामगिरीही भारताने नोंदविली आहे.
  • आयसीएमआरच्या हिस्ट्री टाईमलाईनचे डॉ हर्ष वर्धन यांच्या हस्ते अनावरण- लस पोर्टल आणि कोविड क्लिनिकल रजिस्ट्रीचेही डॉ हर्ष वर्धन यांनी उद्घाटन केले. लस विकसित करण्या संदर्भातल्या स्थितीच्या पारदर्शी माहितीच्या महत्वावर भर देताना, हे पोर्टल लस विकसित करण्यासंदर्भात, सध्या सुरु असलेल्या वैद्यकीय चाचण्या आणि देशात तसेच जागतिक स्तरावर यासंदर्भातली प्रगती याबाबत उपयुक्त आणि महत्वाची माहिती पुरवेल असे त्यांनी सांगितले. कोविड काळात लस विकसित होण्यासंदर्भातल्या घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत  देशातल्या लस विकसित करण्याबाबतच्या स्थितीची माहिती दर्शवणे महत्वाचे ठरले आहे
  • आरोग्य मंत्रालयाच्या ई-संजीवनी टेलिमेडिसीन सेवेने महत्त्वाचा टप्पा ओलांडला:- ई-संजीवनी या बाह्यरुग्ण मंचाने चार लाख टेलिमार्गदर्शन सत्रांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश आघाडीवर असून या राज्यांमध्ये अनुक्रमे 1,33,167 आणि 1,00,124 मार्गदर्शन सत्रांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल हिमाचल प्रदेश (36,527), केरळ (33,340), आंध्र प्रदेश (31,034), उत्तराखंड (11,526), गुजरात (8914), मध्य प्रदेश (8904), कर्नाटक (7684) आणि महाराष्ट्र (7103) या राज्यांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
  • संडे संवाद-3 अंतर्गत डॉ. हर्षवर्धन यांचा समाज माध्यम सदस्यांशी संवाद:- आयसीएमआरच्या सेरो सर्वेक्षणाच्या अहवालाने देशातील जनतेमध्ये आत्मसमाधानाची भावना निर्माण होता कामा नये, असा इशारा त्यांनी दिला. मे 2020 मधील पहिल्या सेरो सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार देशात कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण केवळ 0.73 टक्के होते. लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या दुसऱ्या सेरो सर्वेक्षणामध्ये असे सूचित करण्यात आले आहे की आपण कोणत्याही प्रकारच्या हर्ड इम्युनिटीपासून ( समूहामध्ये निर्माण झालेली रोगप्रतिकारक्षमता) खूपच दूर आहोत आणि त्यामुळेच आपल्यापैकी प्रत्येकाने कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करणे सुरूच ठेवले पाहिजे, याकडे डॉ हर्ष वर्धन यांनी लक्ष वेधले.

इतर अपडेट्स:

महाराष्ट्र अपडेट्स :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा आणि नाशिक विभागातील कोविड संबंधित उपाययोजनांचा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आढावा घेतला. सौम्य लक्षणे रुग्णांना घरी थांबवण्याची परवानगी दिली आहे, मात्र योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजनांशिवाय ते बाहेर पडून इतरांना संक्रमण होईल याविषयी मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान, बृहन्मुंबई महानगपालिकेने आयसीएमआरने पुरवठा बंद केल्यानंतर आरटी-पीसीआर कीटस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. सध्या बीएमसीकडे असलेला साठा ऑक्टोबर अखेरपर्यंत संपुष्टात येईल. महाराष्ट्रात 2.73 लाख सक्रीय रुग्ण आहेत. 

 

 

MC/ST/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1659828) Visitor Counter : 220