रसायन आणि खते मंत्रालय

द्रव वैद्यकीय ऑक्सिजन आणि वैद्यकीय ऑक्सिजन सिलिंडरची किंमत कमी करण्यासाठी एनपीपीएची योजना

Posted On: 26 SEP 2020 3:48PM by PIB Mumbai

 

1.    सध्याच्या कोविड – 19 च्या परिस्थितीमुळे देशभरात वैद्यकीय ऑक्सिजनची (एमओ) मागणी वाढल्याचे दिसत आहे आणि त्यामुळे त्याची उपलब्धता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अनेक राज्य / केंद्रशासित प्रदेश हे वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्यासाठी इतर राज्य / केंद्रशासित प्रदेशांवर अवलंबून आहेत.

2.    वैद्यकीय ऑक्सिजनच्या मागणीमध्ये 750 एमटी / प्रतिदिवस पासून ते 2800 एमटी / प्रतिदिवस पर्यंत जवळपास चारपटींनी वाढ झाली आहे. यामुळे उत्पादन आणि पुरवठ्याच्या मूल्य साखळीमध्ये सर्व स्तरांवर ताण आला आहे. वैद्यकीय ऑक्सिजन आणि फिलर उत्पादकांनी वायूरुपातील वैद्यकूय ऑक्सिजनच्या कमाल मर्यादेच्या किमतीत तीन पट वाढीसाठी सरकारला निवेदन दिले आहे.

3.    विशेषतः या महामारीच्या काळात विनाअडथळा वैद्यकीय ऑक्सिजनचा अखंड पुरवठा करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. ऑक्सिजन इनहलेशन (औषधी वायू) हे एक नियोजित सूत्र आहे, जे आवश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादी (एनएलईएम) अंतर्गत समाविष्ट आहे. याची विद्यमान मर्यादा किंमत रुपये 17.49 / घनमीटर अशी एनपीपीएने निश्चित केली आहे. तथापि, द्रव वैद्यकीय ऑक्सिजनवर किंमत नसल्यामुळे उत्पादकांनी उपभोक्त्यांसाठी किंमत वाढविली आहे. कोविड दरम्यान, सिलेंडर्सद्वारे वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा 10 % पासून वाढून एकूण वापराच्या 50 %  पर्यंत झाला आहे. देशभरात वैद्यकीय ऑक्सिजनच्या निरंतर उपलब्धतेसाठी अखेपर्यंत किंमतीचे नियमन करणे अत्यावश्यक आहे.

4.    ऑक्सिजनच्या किंमतीसह उपलब्धतेशी संबंधित हा मुद्दा भारत सरकारच्या (अधिकारप्राप्त गट 2), सतत विचारात घेण्यात आला आहे. अधिकारप्राप्त गट 2 यांनी एनपीपीए ला शिफारस केली आहे की द्रव ऑक्सिजनची मूळ किंमत (एक्स फॅक्टरी) कमी करण्यासाठी विचार केला जावा, जेणेकरून उपभोक्त्यांना त्याचा उचित दरामध्ये पुरवठा होऊ शकेल. वाजवी किंमतीवर उपभोक्त्यांकडून ऑक्सिजन टाक्यांचा पुरवठा व्हावा, यासाठी एनपीपीएला टाक्यांमधील ऑक्सिजनच्या मूळ किमतीचा (एक्स फॅक्टरी) विचार करण्याची विनंती केली आहे.

5.    या परिस्थितीशी परिणामकारण पद्धतीने तोडगा काढण्यासाठी, भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण (एमओएचअँडएफडब्ल्यू) मंत्रालयाने दिनांक 23.09.2020 च्या पत्राद्वारे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 10 (2) (1) अंतर्गत टाक्यांमधील द्रव वैद्यकीय ऑक्सिजन (एलएमओ) आणि मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता व किंमत त्वरित नियमित करण्यासाठी सर्व आवश्यक ती पावले उचलण्यास एनपीपीएच्या शिष्टमंडळाला अधिकार दिले आहेत.

6.    25.09.2020 रोजी झालेल्या अतिरिक्त सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांनी या संदर्भात विचार केला. जनहितासाठी अतिरिक्त सामान्य शक्ती मागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 10 (2) (1) अंतर्गत डीपीसीओ 13 च्या अनुच्छेद 19 अन्वये साथीच्या आजारामुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे :  

राज्यस्तरावरील वाहतुकीच्या किंमती निश्चित करण्यासाठी, सहा महिन्यांसाठी उत्पादकांना द्रव वैद्यकीय ऑक्सिजनची फॅक्टरी किंमत रोखण्यासाठी रुपये 15.22 / घनमीटर जीएसटी वगळता, आणि वैद्यकीय ऑक्सिजनची एक्स फॅक्टरी किंमत पूर्ण करण्यासाठी रुपये 25.71/ घनमीटर जीएसटी वगळता विद्यमान मर्यादा किंमत रुपये 17.49 / घनमीटर राहील.

7.    ऑक्सिजन खरेदीसाठी राज्य सरकारांचे विद्यमान दर करार, ग्राहकांच्या हितासाठी चालू राहतील.

एलएमओ आणि ऑक्सिजन गॅस सिलिंडर्सची मूळ किंमत (एक्स फॅक्टरी प्राइस कॅप) घरगुती उत्पादनास लागू होईल.

वरील उपायांद्वारे वैद्यकीय ऑक्सिजनची उपलब्धता रुग्णालयाच्या स्तरावर आणि ऑक्सिजन सिलिंडर्सद्वारे खासकरून दूरवर आणि अंतर्गत जिल्ह्यांतही योग्य किमतीत वैद्यकीय ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित होईल.

......

R.Tidke/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1659300) Visitor Counter : 269