संरक्षण मंत्रालय

संरक्षण खरेदी प्रक्रिया- 2020 चे संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते अनावरण

Posted On: 28 SEP 2020 3:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  28 सप्टेंबर  2020

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत संरक्षण खरेदी प्रक्रिया ( डीएपी) - 2020 चे अनावरण केले. पहिली संरक्षण खरेदी प्रक्रिया 2002 मध्ये जारी करण्यात आली होती. देशांतर्गत वाढत्या   उद्योगाला चालना देण्यासाठी आणि संरक्षण उत्पादनात अधिक  स्वयंपूर्णता आणण्याच्या दृष्टीने या प्रक्रियेचा वेळोवेळी आढावा घेण्यात येतो.डीएपी 2020 तयार करण्यासाठी महासंचालक ( खरेदी ) अपूर्व चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य आढावा समिती स्थापन करण्यासाठी संरक्षणमंत्र्यांनी ऑगस्ट 2019 मध्ये मान्यता दिली.1 ऑक्टोबर 2020 पासून डीएपी 2020 लागू होणार आहे. डीएपी 2020 तयार करण्यासाठी  एक वर्षापेक्षा जास्त काळ लागला, व्यापक संबंधितांच्या सूचना आणि टिप्पणीचा यात अंतर्भाव करण्यात आला.

केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानाशी आणि  मेक इन इंडिया अभियानाद्वारे  भारतीय  देशांतर्गत उद्योग सबलीकरणाशी डीएपी 2020 ची सांगड घालण्यात आली असून भारत जागतिक उत्पादन केंद्र ठरावा हा यामागचा उद्देश आहे. जाहीर झालेल्या नव्या थेट परकीय गुंतवणुक धोरणानुसार डीएपी 2020 मध्ये आयातीसाठी पर्याय आणि निर्यात यासाठी भारतीय देशांतर्गत उद्योगांचे हितरक्षण करत उत्पादन केंद्र उभारण्यासाठी  थेट परकीय गुंतवणुकीला चालना देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

आढाव्यात व्यवसाय सुलभतेवर लक्ष केंद्रित करण्यात आले त्याच वेळी सुलभीकरण, आणि प्रक्रिया, उद्योग स्नेही करण्यावर भर देण्यात आला.

डीएपी 2020 ची प्रमुख वैशिष्टे –

भारतीय विक्रेत्यांसाठी श्रेणीमध्ये आरक्षण-  खरेदी ( भारतीय- आयडीडीएम ), मेक ई I, मेक II, डिझाईन आणि विकास उत्पादन एजन्सी,ओएफबी/डीपीएसयु आणि एसपी मॉडेल भारतीय विक्रेत्यांसाठीच राखीव ठेवण्यात येतील. यासाठी मालकी आणि नियंत्रण भारतीय निवासी नागरिकाकडे आवश्यक आणि थेट परकीय गुंतवणूक 49% पेक्षा जास्त असता कामा नये  या निकषांची पूर्तता करायची आहे.

डीआरडीओ/ डीपीएसयु/ओएफबी यांनी डिझाईन आणि विकसित केलेल्या प्रणाली खरेदीसाठी डीएपी 2020 मध्ये स्वतंत्र अध्याय ठेवण्यात आला आहे.

एकीकृत एकल टप्पा चाचणी सह सुलभ प्रक्रिया आणि प्रमाणीकरणाच्या माध्यमातून मुल्याकनावर मोठा भर देण्यात आला आहे.

ऑफसेट- ऑफसेट मार्गदर्शक तत्वात सुधारणा करण्यात आली असून भागापेक्षा संपूर्ण संरक्षण उत्पादनाची निर्मिती करणाऱ्याला प्राधान्य दिले जाईल. 

 

M.Chopade/N.Chitale/ P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1659771) Visitor Counter : 306