PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 23 SEP 2020 8:52PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 23 सप्टेंबर 2020

 

Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :

देशाने दररोज 12 लाखापेक्षा जास्त कोरोना चाचण्या करण्याची क्षमता गाठली आहे. देशात एकूण 6.6 कोटीपेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या आहेत. चाचण्यांच्या मोठ्या प्रमाणामुळे कोरोना बाधित लवकर ओळखणे शक्य होते. हा  पॉझीटीव्हिटी दर  नंतर कमी होतो असे आढळून आले आहे.

भारतात अतिशय मोठ्या प्रमाणात चाचण्या होत असल्याच्या पार्श्वभूमीवर  14 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशात दहा लाख लोकसंख्येत होणारे चाचण्यांचे प्रमाण हे  राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे तर पॉझीटीव्हिटी दर, राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. 

राष्ट्रीय पॉझीटीव्हिटी दर 8.52% आहे तर दहा लाख लोकसंख्येत होणारे चाचण्यांचे प्रमाण आज 48,028 आहे.

देशात गेल्या 24 तासात 83,347  नव्या रुग्णांची नोंद झाली. यापैकी 74%  रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात आहेत.

केवळ महाराष्ट्रात 18,000 पेक्षा जास्त नवे  रुग्ण असून आंध्रप्रदेश मध्ये 7,000 पेक्षा जास्त तर कर्नाटकमध्ये 6,000 पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत.

गेल्या 24 तासात 1,085 मृत्यूंची नोंद झाली.

कोविड मुळे गेल्या 24 तासात झालेल्या  मृत्युपैकी 83% मृत्यू 10 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत.

महाराष्ट्रात 392, कर्नाटक मध्ये 83 तर उत्तर प्रदेश मध्ये 77 मृत्यूंची नोंद झाली.

 

उद्दिष्ट पूर्ततेच्या दिशेने आखलेली धोरणे परिणामकारक आणि सर्वसमावेशक आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना यामुळे भारतातील रोगमुक्तांच्या संख्येत सलग झपाट्याने वाढ होत आहे.

सलग पाचव्या दिवशी भारतातील नवीन रोगमुक्तांच्या संख्येत वाढ झाली.

गेल्या चोवीस तासात 89,746 एवढी रोगमुक्त यांची संख्या देशात नोंदवली गेली तर नवीन बाधितांची संख्या 83,347  आहे.

यासह रोगमुक्त  होणाऱ्यांची एकूण संख्या 45,87,613 यावर पोहोचली तर रोगमुक्तीचा दर आज 81.25% ला पोहोचला.

भारतातील रोगमुक्त झालेल्याची संख्या  जगभरात सर्वाधिक आहे. जागतिक रोगमुक्तीच्या दरात भारताचा वाटा 19.5 टक्के आहे.

राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पुढील प्रमाणे अंमलबजावणी करत असल्यामुळे नवीन बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या भारतात जास्त नोंदवली जात आहे.

17 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात नवीन बाधितांपेक्षा नवीन रोगमुक्तांची संख्या जास्त आहे.

75% नवीन रोगमुक्तांची संख्या  दहा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशातून  नोंदवली गेली आहे. ही राज्ये म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, आणि तामिळनाडू, ओडिशा, दिल्ली, केरळ ,पश्चिम बंगाल आणि हरियाणा.

वीस हजार पेक्षा जास्त नवीन रोगमुक्तांच्या संख्येसह यात महाराष्ट्र आघाडीवर आहे तर आंध्रप्रदेशने दिवसभरात रोगमुक्तांची संख्या दहा हजार नोंदवली आहे.

 

इतर अपडेट्स:

लोकसभेत तीन ऐतिहासिक श्रम संहिता विधेयकांना मंजुरी : केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी या विधेयकांवरील चर्चेला उत्तर देतांना सांगितले की सभागृहात मांडण्यात आलेली विधेयके कामगार सुधारणा क्षेत्रात ऐतिहासिक विधेयके असून ती श्रम सुधारणेच्या क्षेत्रात अत्यंत महत्वपूर्ण सिध्द होतील. या विधेयकाचा लाभ देशातील संघटीत आणि असंघटीत क्षेत्रातील 50 कोटी श्रमिकांना मिळणार आहे, असे गंगवार यांनी सांगितले

एकूण कोविड 19 रुग्णांपैकी 76 टक्के रुग्ण आढळणाऱ्या प्रमुख दहा राज्यांमध्ये 'कोविड19 संपर्क अभियान' राबविण्याच्या सूचना केंद्राने या राज्यांना दिल्या आहेत. हे एक जन संपर्क अभियान असून याद्वारे समाजातील शेवटच्या स्तरातील लोकांना कोविडविरुद्धच्या लढ्यात उचित वर्तन करण्यासंदर्भात प्रोत्साहन दिले जाणार आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, छत्तीसगड, ओडिशा, केरळ, तेलंगणा आणि दिल्ली अशी ही 10 राज्ये असून यामध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, सांगली आणि कोल्हापूर हे प्रमुख कोविड संपर्क जिल्हे म्हणून निवडण्यात आले आहेत.

कोविड-19 महामारीसंदर्भात आशा  कार्यकर्त्याचे, लक्षणीय योगदान लक्षात घेऊन, त्यांना दरमहा अतिरिक्त 1000 रुपये देण्यात येत आहेत. याशिवाय राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी, आशा  सेविकांसाठी मास्क, सॅनीटायझर यासारख्या सुरक्षितता उपायांची खातरजमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोविड महामारी दरम्यान थोडक्या प्रमाणातील प्राणवायूची तातडीची गरज भागवण्यासाठी  एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याची त्वरित वाहतूक करणे अनिवार्य आहे. हे लक्षात घेऊन अश्या  थोड्या प्रमाणातील प्राणवायूच्या वाहतुकीसाठी ISO कंटेनर ना मंजुरी देण्यात आली आहे.

गरिबांसाठीच्या 'प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या' पहिल्या टप्प्यात म्हणजे, 'PMGKAY-I' मध्ये, एप्रिल ते जून-2020 या तीन महिन्यांसाठी विभागाने 30.03.2020 रोजी, एकूण सुमारे 121 लाख मेट्रिक टन अन्नधान्य सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना वितरित केले होते. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याच्या लाभार्थ्यांना अतिरिक्त धान्यपुरवठा विनामूल्य करता येण्याच्या उद्देशाने हे वितरण करण्यात आले होते. विभागाकडे उपलब्ध असलेल्या अहवालानुसार, 'PMGKAY-I' अंतर्गत या तीनही महिन्यात राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी सरासरी सुमारे 94% धान्याचे वितरण केले.

कोविड-19 महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीदरम्यान आर्थिक प्रतिसाद म्हणून सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 च्या लाभार्थ्यांना एप्रिल ते नोव्हेंबर 2020 या आठ महिन्यांसाठी प्रतिमाह प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्य आणि 1 किलो डाळी मोफत वितरीत केल्या. ग्राहक व्यवहार विभागाकडे डाळींच्या वितरणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पीएमजीकेएवायच्या पहिल्या टप्प्यात, 18.27 कोटी लाभार्थ्यांना एप्रिल ते जून काळात 5,48,172.44 मेट्रीक टन डाळींचे वितरण केले. तर, दुसऱ्या टप्पा नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आला आहे.

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत स्थलांतरित किंवा अडकलेल्या मजुरांसाठी तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 मध्ये समाविष्ट नसलेले, त्याच बरोबर कोणत्याही राज्याच्या सार्वजनिक वितरण प्रणालीत समाविष्ट नसलेल्यांसाठी मोफत अन्नधान्य पुरवण्यासाठी, विभागाकडे स्थलांतरित/अडकलेल्या मजुरांची नेमकी आकडेवारी उपलब्ध नसल्याने ढोबळमानाने 8 कोटी व्यक्ती असल्याचा अंदाज लावण्यात आला.( राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत 80 कोटी लोकसंख्येच्या 10 %) . जास्तीत जास्त स्थलांतरित / अडकलेल्या मजुरांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी, मे आणि जून 2020 या दोन महिन्यासाठी 8 लाख मेट्रिक टन ( तांदूळ/गहू ) अन्नधान्याचे राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना वितरण करण्यात आले.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग व रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी आज जी -20 व्यापार आणि  गुंतवणूक मंत्र्यांच्या आभासी बैठकीत भाग घेतला. बैठकीत हस्तक्षेप करत त्यांनी जी -20  देशांना कोविड 19 मधून बरे होण्याचा मार्ग प्रशस्त  करण्यासाठी आघाडीची भूमिका बजावण्याचे आवाहन  केले, ते म्हणाले की, सर्व देशांसाठी  मुख्य धडा म्हणजे बाह्य आणि अंतर्गत आर्थिक धोरणांमध्ये योग्य संतुलन राखण्याची गरज आहे, जेणेकरून संतुलित आणि शाश्वत विकास सुनिश्चित होईल.  ते म्हणाले की, समावेशक आणि विकासाभिमुख कार्यक्रम राबविण्यासाठी भारत सर्व जी -२० सदस्यांबरोबर रचनात्मकपणे सहभागी व्हायला  तयार आहे.

राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाने (एनपीपीए) राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांची यादी (एनएलईएम), 2015 अंतर्गत 871 निर्धारित औषधांच्या कमाल किंमती निश्चित केल्या आहेत.कमाल मर्यादा किंमतीच्या निर्धारणात औषध मूल्य नियंत्रण ऑर्डर (डीपीसीओ) 2013 अंतर्गत कार्डियाक स्टेंटची कमाल किंमत समाविष्ट आहे, ज्यामुळे कोरोनरी स्टेंटची किंमत बेअर मेटल स्टेंटसाठी 85% आणि ड्रग इल्युटिंग स्टेंटसाठी 74% पर्यंत कमी झाली.

संपूर्ण जगभर कोविड-19 महामारीचा झालेला उद्रेक लक्षात घेवून परदेशातल्या भारतीयांना मायदेशात सुखरूप परत आणण्यासाठी सरकारने ‘वंदे भारत मिशन’ सुरू केले. या मोहिमेविषयी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दि. 31.08.2020 पर्यंत 11 लाखांपेक्षा जास्त भारतीयांना मायदेशी आणण्यात आले.

 

महाराष्ट्र अपडेट्स :

आज सलग चोथ्या दिवशी महाराष्ट्रात नवीन कोविड रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मंगळवारी 20,206 रुग्ण कोविड मधून बरे झाले तर 18,390 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली. मुंबईतही बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन कोविड रुग्णाच्या संख्येपेक्षा जास्त दिसून आली. मुंबईत 1,669 रुग्ण बरे झाले तर 1,628 नवीन कोविड रुग्ण आढळून आले. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. राज्यात 2.72 लाख रुग्ण उपचार घेत असून मुंबईत 26,764 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांना कोविड-19 ची लागण झाली आहे

FACT CHECK

*****

M.Chopade/S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1658377) Visitor Counter : 8