कृषी मंत्रालय
प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज – आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना लाभ
Posted On:
23 SEP 2020 2:44PM by PIB Mumbai
कोविड-19 महामारीसंदर्भात आशा कार्यकर्त्याचे, लक्षणीय योगदान लक्षात घेऊन, त्यांना दरमहा अतिरिक्त 1000 रुपये देण्यात येत आहेत. याशिवाय राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी, आशा सेविकांसाठी मास्क, सॅनीटायझर यासारख्या सुरक्षितता उपायांची खातरजमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना, कोविड-19 संदर्भात काम करणाऱ्या कर्मचारी आणि आरोग्य सेवकांना त्यांच्या धोरणानुसार, भारत कोविड-19 आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणा सज्जता पॅकेज अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या संसाधनातून प्रोत्साहनपर रक्कम देण्याची मुभा देण्यात आली आहे.
कोविड- 19 साठीच्या लढ्यात आघाडीवर राहून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी, 30 मार्च 2020 ला जाहीर करण्यात आलेल्या प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेज विमा योजनेचे जीवन विमा लाभ, सर्व आरोग्य सेवा कर्मचाऱ्यापर्यंत व्यापक करण्यात आले आहेत. या योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार विम्याची रक्कम पुरवण्यासाठी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने, न्यू इंडिया एश्यूरन्स कंपनीशी सहयोग केला आहे. आरोग्य सेवा पुरवणाऱ्याला 50 लाख रुपयांचे कवच या विमा योजने अंतर्गत पुरवण्यात येते. कोविड-19 रुग्णाच्या सेवेसाठी त्यांच्या थेट संपर्कात आल्याने संसर्गाचा धोका जास्त असणाऱ्या कम्युनिटी आरोग्य कर्मचाऱ्यांनाही ही योजना लागू आहे.
खाजगी रुग्णालय कर्मचारी, निवृत्त, स्वयंसेवी,स्थानिक नागरी संस्था,रोजंदारी,राज्यांनी मागणी केल्यानुसार आउटसोर्स कर्मचारी,केंद्रीय रुग्णालये, केंद्र/राज्य/केंद्रशासित प्रदेश,यांची स्वायत्त रुग्णालये, एम्स,आयएनआय,कोविड-19 संदर्भातल्या कामांसाठी केंद्रीय मंत्रालयाने उभारलेली रुग्णालये यांचा या योजनेत समावेश आहे.
प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत लाभार्थींचा तपशील :
कोविड-19 विरोधातल्या लढ्यातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना, राज्ये/ केंद्रशासित प्रदेश- 20.09.2020 रोजी
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
U.Ujgare/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1658148)
Visitor Counter : 189