आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
सर्वाधिक रोगमुक्तांचा दर भारताने कायम राखला
सलग पाचव्या दिवशी नवीन रोगमुक्तांची संख्या वाढली
सातत्याने वाढत असलेल्या रोगमुक्तांच्या संख्येचा दर 81 रक्क्यांच्या पार
प्रविष्टि तिथि:
23 SEP 2020 1:52PM by PIB Mumbai
उद्दिष्ट पूर्ततेच्या दिशेने आखलेली धोरणे परिणामकारक आणि सर्वसमावेशक आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना यामुळे भारतातील रोगमुक्तांच्या संख्येत सलग झपाट्याने वाढ होत आहे.
सलग पाचव्या दिवशी भारतातील नवीन रोगमुक्तांच्या संख्येत वाढ झाली.
गेल्या चोवीस तासात 89,746 एवढी रोगमुक्त यांची संख्या देशात नोंदवली गेली तर नवीन बाधितांची संख्या 83,347 आहे.

यासह रोगमुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या 45,87,613 यावर पोहोचली तर रोगमुक्तीचा दर आज 81.25% ला पोहोचला.
भारतातील रोगमुक्त झालेल्याची संख्या जगभरात सर्वाधिक आहे. जागतिक रोगमुक्तीच्या दरात भारताचा वाटा 19.5 टक्के आहे.
राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पुढील प्रमाणे अंमलबजावणी करत असल्यामुळे नवीन बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या भारतात जास्त नोंदवली जात आहे.
17 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात नवीन बाधितांपेक्षा नवीन रोगमुक्तांची संख्या जास्त आहे.

75% नवीन रोगमुक्तांची संख्या दहा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशातून नोंदवली गेली आहे. ही राज्ये म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, आणि तामिळनाडू, ओडिशा, दिल्ली, केरळ ,पश्चिम बंगाल आणि हरियाणा.
वीस हजार पेक्षा जास्त नवीन रोगमुक्तांच्या संख्येसह यात महाराष्ट्र आघाडीवर आहे तर आंध्रप्रदेशने दिवसभरात रोगमुक्तांची संख्या दहा हजार नोंदवली आहे.

****
U.Ujgare/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1658117)
आगंतुक पटल : 238