ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा
Posted On:
23 SEP 2020 4:01PM by PIB Mumbai
कोविड-19 महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीदरम्यान आर्थिक प्रतिसाद म्हणून सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 च्या लाभार्थ्यांना एप्रिल ते नोव्हेंबर 2020 या आठ महिन्यांसाठी प्रतिमाह प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्य आणि 1 किलो डाळी मोफत वितरीत केल्या. ग्राहक व्यवहार विभागाकडे डाळींच्या वितरणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पीएमजीकेएवायच्या पहिल्या टप्प्यात, 18.27 कोटी लाभार्थ्यांना एप्रिल ते जून काळात 5,48,172.44 मेट्रीक टन डाळींचे वितरण केले. तर, दुसऱ्या टप्पा नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त, आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत जे प्रवासी मजूर एनएफएसएअंतर्गत येत नाहीत, त्यांना प्रतिव्यक्ती प्रतिमहिना 5 किलो अन्नधान्य आणि 1 किलो डाळी एप्रिल आणि मे या दोन महिन्यांसाठी मोफत वितरीत केल्या. आत्मनिर्भर भारत अभियानाने टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित केली होती.
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.
****
M.Chopade/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1658175)
Visitor Counter : 132