नागरी उड्डाण मंत्रालय
‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत 11 लाखांपेक्षा जास्त भारतीय मायदेशी परतले
संपूर्ण देशात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ‘उडान’ उपक्रम
Posted On:
22 SEP 2020 9:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2020
संपूर्ण जगभर कोविड-19 महामारीचा झालेला उद्रेक लक्षात घेवून परदेशातल्या भारतीयांना मायदेशात सुखरूप परत आणण्यासाठी सरकारने ‘वंदे भारत मिशन’ सुरू केले. या मोहिमेविषयी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दि. 31.08.2020 पर्यंत 11 लाखांपेक्षा जास्त भारतीयांना मायदेशी आणण्यात आले. या संदर्भात कोणत्या देशातून किती नागरिक आले आणि ते कोणकोणत्या राज्यांचे होते, याचा संपूर्ण तपशील अनुच्छेद अ मध्ये देण्यात आला आहे. हा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करावे.
जीवनवाहिनी ठरला उडान उपक्रम
नागरी उड्डाण मंत्रालयाने दि.26.03.2020 रोजी लाइफलाइन उडान सेवा सुरू केली. या सेवेमुळे महामारीच्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये वैद्यकीय सामुग्री, पीपीई संच, कोरोना चाचणी संच, तसेच औषधे यांचा पुरवठा करणे शक्य झाले. त्यामुळे उडान ही सेवा जीवनवाहिनी ठरली. या काळामध्ये सर्व राज्यांकडून तसेच केंद्रशासित प्रदेशांकडून येणा-या मागणीप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. इतर मंत्रालयाच्या आवश्यकतां प्रमाणेही तसेच एचएलएल आणि आयसीएमआर सारख्या संस्थांच्या कार्यासाठी उडान उपक्रमाची मदत झाली.
प्रारंभी माल पाठवणारे, प्रेषक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच संस्था उडानच्या वाहतुकीचा खर्च करीत होते. तथापि, मागणी वाढत गेल्यामुळे नागरी उड्डाण मंत्रालयाच्यावतीने आकस्मिक निधीतून ‘उडान’उपक्रमासाठी खर्च करण्यात आला. या खर्चासाठी 30 कोटी रुपये मंत्रालयाने मंजूर केले आहेत. दि. 18.09.2020 पर्यंत उडान उपक्रमासाठी झालेला खर्च म्हणून 18.95 कोटी रुपये नागरी उड्डाण मंत्रालयाने या योजनेत कार्यरत असलेल्या विमानासेवांना दिले आहेत. उडान उपक्रमाअंतर्गत राज्यनिहाय उड्डाणांचा तपशील अनुच्छेद ब मध्ये देण्यात आला आहे. हा तपशील जाणून घेण्यासाठी (येथे क्लिक) करावे.
दूरस्थ नियंत्रक वैमानिक हवाई कार्यप्रणाली
नागरी उड्डाण मंत्रालयाने दि. 31.08.2020 पर्यंत दूरस्थ नियंत्रक वैमानिक हवाई कार्यप्रणालीच्या वापरासाठी राज्य सरकारांच्या एजन्सींना सशर्त सवलत दिली आहे.
- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि.
- कृषी आयुक्तालय, राजस्थान सरकार
- कृषी विभाग, कृषी शिक्षण आणि संशोधन - उत्तर प्रदेश सरकार
- कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, हरियाणा सरकार.
- संचालक, प्लांट प्रोटेक्शन, क्वारटाइन अँड स्टोअरेज, फरिदाबाद
- तेलंगणा राज्य उड्डाण अकादमी, हैद्राबाद
अशी माहिती नागरी उड्डाण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) हरदीप सिंग पुरी यांनी आज लोकसभेत दिली.
* * *
B.Gokhale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1657946)
Visitor Counter : 187