वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
कोविड-19 महामारीच्या प्रकोपात पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संस्थेच्या नवीन आयएसओ कंटेनरद्वारे द्रवीभूत प्राणवायूची स्थानिक वाहतूक करण्यास परवानगी
प्रविष्टि तिथि:
23 SEP 2020 1:43PM by PIB Mumbai
कोविड महामारी दरम्यान थोडक्या प्रमाणातील प्राणवायूची तातडीची गरज भागवण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याची त्वरित वाहतूक करणे अनिवार्य आहे. हे लक्षात घेऊन अश्या थोड्या प्रमाणातील प्राणवायूच्या वाहतुकीसाठी ISO कंटेनर ना मंजुरी देण्यात आली आहे.
वाणिज्य आणि अंतर्गत व्यापार विभाग (DPIIT), या वाणिज्य आणि व्यापार उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील विभागाने पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संस्थेने आणलेल्या द्रवीभूत प्राणवायूच्या स्थानिक वाहतुकीला उपयुक्त अशा भारतीय मानक ब्यूरो प्रमाणित कंटेनरना मान्यता दिली आहे.
नोवेल कोरोनाविषाणू महामारी (covid-19) दरम्यान देशात भारतीय मानक ब्यूरो प्रमाणित कंटेनरमधून प्राणवायूची वाहतूक करणे हे रस्ते वाहतूकीच्या माध्यमातून प्राणवायूच्या जलद आणि सुरक्षित वाहतुकीला उपयुक्त ठरेल.
क्रायोजनिक प्राणवायूच्या उत्पादकांबरोबर चर्चा केल्यानंतर प्राणवायूच्या थोड्या प्रमाणातील वापरासाठी वाहतुकीला DPIIT च्या भारतीय मानक ब्यूरो प्रमाणित टँक कंटेनरच्या वापरास परवानगी देण्यात आली .
या बाबतीत सर्व संबंधितांशी विचार विनिमय करण्यात आला. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून एक वर्षासाठी ही त्वरित परवानगी दिली आहे.
यासंदर्भात पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संस्थेने (PESO) ऑक्सिजनसाठी भारतीय मानक ब्युरो प्रमाणित टँक कंटेनर संबंधितांना त्वरीत परवान्यासाठी अर्ज करता यावा म्हणून नोंदणीसाठी मॉड्युल विकसित केले आहे.
ISO टैंक हा आंतरराष्ट्रीय मानका संस्थेच्या मानकांवर खरा ठरणारा टॅंक आहे. तो स्टेनलेस स्टीलचा असून त्यासभोवती विविध सुरक्षित अच्छादन आहे. या ISO टँकर मधून 20 मेट्रिक टन पर्यंत द्रवीभूत ऑक्सिजनची वाहतूक करता येईल.
या ISO कंटेनर मधून एका खेपेत प्राणवायूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार असल्यामुळे गरज असेल तेथे प्राणवायू उपलब्ध होण्यास याचा उपयोग होईल.
******
U.Ujgare/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1658113)
आगंतुक पटल : 218