आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 बाबत ताजी माहिती
14 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात दहा लाख लोकसंख्येमागे चाचण्यांचे प्रमाण देशाच्या सरासरीपेक्षा जास्त तर पॉझीटीव्हिटी दर कमी
नव्या रुग्णांपैकी 74% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात
Posted On:
23 SEP 2020 3:47PM by PIB Mumbai
देशाने दररोज 12 लाखापेक्षा जास्त कोरोना चाचण्या करण्याची क्षमता गाठली आहे. देशात एकूण 6.6 कोटीपेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या आहेत. चाचण्यांच्या मोठ्या प्रमाणामुळे कोरोना बाधित लवकर ओळखणे शक्य होते. हा पॉझीटीव्हिटी दर नंतर कमी होतो असे आढळून आले आहे.
भारतात अतिशय मोठ्या प्रमाणात चाचण्या होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 14 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशात दहा लाख लोकसंख्येत होणारे चाचण्यांचे प्रमाण हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे तर पॉझीटीव्हिटी दर, राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे.
राष्ट्रीय पॉझीटीव्हिटी दर 8.52% आहे तर दहा लाख लोकसंख्येत होणारे चाचण्यांचे प्रमाण आज 48,028 आहे.
देशात गेल्या 24 तासात 83,347 नव्या रुग्णांची नोंद झाली. यापैकी 74% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात आहेत.
केवळ महाराष्ट्रात 18,000 पेक्षा जास्त नवे रुग्ण असून आंध्रप्रदेश मध्ये 7,000 पेक्षा जास्त तर कर्नाटकमध्ये 6,000 पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत.
गेल्या 24 तासात 1,085 मृत्यूंची नोंद झाली.
कोविड मुळे गेल्या 24 तासात झालेल्या मृत्युपैकी 83% मृत्यू 10 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत.
महाराष्ट्रात 392, कर्नाटक मध्ये 83 तर उत्तर प्रदेश मध्ये 77 मृत्यूंची नोंद झाली.
M.Chopade/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1658168)
Visitor Counter : 197