PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 16 SEP 2020 7:30PM by PIB Mumbai

Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

दिल्ली-मुंबई, 16 सप्टेंबर 2020

 

आयुर्वेदाचे सखोल ज्ञान वापरून कोविड-19 महामारीशी लढण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचार पद्धती  म्हणून वापर करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले. आयुर्वेदात सांगितलेल्या नैसर्गिक उपाययोजनांच्या मदतीने आपली प्रतिकारशक्ती वाढवून विषाणूंशी लढा देता येईल असे ते म्हणाले.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात भारताने सातत्याने नवा उच्चांक नोंदविला आहे. एका दिवसात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याची नोंद गेल्या 24 तासांत भारताने केली आहे. कोविडचे 82,961 रूग्ण बरे झाले असून त्यांना गृह/ विलगीकरण सुविधा केंद्रातून तसेच रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. याद्वारे रुग्ण बरे होण्याचा दर 78.53% वर पोहोचला आहे.

रुग्ण बरे होण्याची साप्ताहिक सरासरी ही बरे होण्याच्या प्रमाणातील सातत्यपूर्ण वाढ दर्शविते.

गेल्या 24 तासात कोविडचे 82,961 रुग्ण बरे झाले आणि हा एका दिवसातील रुग्ण बरे होण्याचा नवा उच्चांक आहे. 

एकूण 39,42,360 रुग्ण बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासात कोविडचे नवीन रुग्ण बरे होण्यात महाराष्ट्राचा वाटा 23.41% म्हणजे (19423) तर आंध्र प्रदेश (9628), कर्नाटक (7406), उत्तर प्रदेश (6680) आणि तामिळनाडू (5735) या राज्यांचा मिळून वाटा 35.5% आहे.

या पाच राज्यात मिळून सुमारे 59% नवीन रुग्ण बरे झाले.

27 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात रुग्ण बरे होण्याचा दर 70% पेक्षा जास्त आहे.

आजपर्यंत देशात 9,95,933 सक्रिय रुग्ण आहेत.

बरे होणारे आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत आज 29 लाखांच्या पुढे गेली आहे (29,46,427). बरे होणाऱ्यांचे प्रमाण सक्रिय रुग्णांच्या जवळपास चौपट (3.96) आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडूमध्ये जवळपास 60% सक्रिय रुग्ण आहेत.

एकूण सक्रिय प्रकरणांपैकी 70% प्रकरणे ही नऊ सर्वात जास्त प्रभावित राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये आढळतात.

गेल्या 24 तासात देशात 90,123 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत 20,000 हून अधिक नवीन रुग्णांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ आंध्र प्रदेश (8846) आणि कर्नाटक (7576) यांचा क्रमांक लागतो.

 

इतर अपडेट्स:

 

महाराष्ट्र अपडेट्स :

राज्य सरकारने राज्यातील सर्व रूग्णालयात सीटी स्कॅन चाचण्या घेण्यासाठी शुल्क निश्चित करण्यासाठी चार सदस्यीय समिती गठीत केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, विविध रुग्णालयांकडून जास्त पैसे आकारण्याबाबतच्या अनेक तक्रारीनंतर सरकारने या चाचण्यांसाठीच्या दरासंदर्भात निर्णय घेतला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्रम राबविण्यासाठी सर्व गाव सरपंचांना मदत करण्याचे आव्हान केले आहे. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील 28000 सरपंचांशी आभासी बैठक घेतली.

FACT CHECK

 

* * *

R.Tidke/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1655273) Visitor Counter : 16