सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
रूग्णालयांच्या आरोग्यसेवा आणि अन्य आरोग्य कर्मचार्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उचललेली पावले
प्रविष्टि तिथि:
16 SEP 2020 3:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2020
कोविड -19 महामारी दरम्यान रुग्णालयांची स्वच्छता आणि वैद्यकीय कचरा संबंधित आरोग्य आणि सुरक्षा धोक्यांमुळे मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांबाबत रुग्णालये व दवाखाने हा राज्यांचा विषय असून केंद्र सरकारमध्ये कोणतीही माहिती ठेवली जात नाही.
राज्यांना संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण समित्यांची स्थापना करायला सांगण्यात आले. रुग्णालयांनाही एक नोडल अधिकारी निवडण्यास सांगितले जे आरोग्य सेवा कर्मचार्यांवर देखरेख ठेवतील आणि त्यांच्या स्थितीचा आढावा घेतील. उच्च जोखमीची लक्षणे आढळणाऱ्यांना 7 दिवस विलगीकरणात ठेवले जाते. अशा प्रकारच्या डॉक्टर, नर्सिंग अधिकारी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या क्लिनिकल प्रोफाईलच्या आधारे / नोडल ऑफिसर / विभाग प्रमुख (किंवा त्यांची नेमणूक केलेली उपसमिती) एका आठवड्यात पुढील कालावधीसाठी निर्णय घेते. रुग्णालयाच्या कोविड आणि बिगर -कोविड भागात आरोग्य व्यवस्थापनासाठी 18 जून 2020 रोजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आरोग्य क्षेत्रातील इतर कामगारांसह आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पीपीईचा तर्कसंगत वापर करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कामाच्या ठिकाणी रोगाचा धोका संभवण्याच्या जोखमीशी सुसंगत पीपीईचा प्रकार वापरला जावा असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. तसेच राज्य सरकारांना संसर्ग प्रतिबंध व नियंत्रण पद्धतीविषयी मार्गदर्शक सूचना पुरवली आहे. राज्यांना रुग्णालयातील पदाधिकाऱ्यांना संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण पद्धतींबद्दल प्रशिक्षण देण्याची विनंती करण्यात आली. आय.जी.ओ.टी. मंचावर सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा कामगारांसाठी संसर्ग प्रतिबंध व नियंत्रणाचे प्रशिक्षणदेखील उपलब्ध करुन देण्यात आले होते.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
B.Gokhale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1654990)
आगंतुक पटल : 271