आयुष मंत्रालय
आयुर्वेद शिक्षण व संशोधन संस्था विधेयक 2020 आज संसदेत मंजूर
Posted On:
16 SEP 2020 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2020
आयुर्वेद शिक्षण व संशोधन संस्था विधेयक 2020 आज राज्यसभेत मंजूर झाले. यापूर्वी 19 मार्च 2020 रोजी हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले होते.
आज राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर, गुजरातमधील जामनगर येथे अत्याधुनिक आयुर्वेद शिक्षण व संशोधन संस्था (आयटीआरए) स्थापन करण्याचा आणि त्याला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा (आयएनआय) प्रदान करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
गुजरात आयुर्वेद विद्यापीठ कॅम्पस जामनगर येथे सध्या अस्तित्त्वात असलेल्या आयुर्वेद संस्थाचे एकत्रीकरण एकत्रित करून आयटीआरएची स्थापना करण्याचा प्रयत्न केला जात आहे. (अ) आयुर्वेद पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन संस्था, (ब) श्री गुलाब कुंवरबा आयुर्वेद महाविद्यालय, आणि (क) आयुर्वेदिक औषधनिर्माण संस्था, (ड) महर्षि पतंजली योग निसर्गोपचार शिक्षण व संशोधन संस्था (प्रस्तावित आयटीआरएच्या स्वास्तृत्व विभागाचा भाग बनण्यासाठी) या नामांकित संस्थाचा एक समूह असेल. या संस्था मागील अनेक दशकांपासून अस्तित्वात असून या आयुर्वेद संस्थांचा विशेष समूह आहे.
या प्रस्तावाच्या अंमलबजावणीमुळे संस्थेला आयुर्वेद आणि औषध निर्माण विज्ञान विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची पद्धत विकसित करण्यासाठी स्वायत्तता मिळेल अशी अपेक्षा आहे. वेगवेगळ्या संस्थांमधील समन्वयामुळे आयटीआरएला अशा आयुर्वेद शिक्षणात उच्च मानकांचे प्रतिपादन करण्यास आणि संपूर्ण आयुष क्षेत्रामध्ये प्रकाशस्तंभ संस्था म्हणून नावारूपास येण्यात मदत होईल. औषध विज्ञानासह आयुर्वेदातील सर्व महत्वाच्या शाखांमध्ये कर्मचार्यांचे उच्च स्तरीय प्रशिक्षण आणि आयुर्वेद क्षेत्रात सखोल अभ्यास व संशोधन करणे अपेक्षित आहे.
आयटीआरए ही आयुष क्षेत्रातील आयएनआय दर्जाची पहिली संस्था असेल, आणि यामुळे या अभ्यासक्रमाची सामग्री आणि अध्यापनशस्त्रा बाबतीत स्वतंत्र व नाविन्यपूर्ण निर्णय घेण्यात हि संस्था सक्षम होईल. पारंपारिक ज्ञान-आधारित आरोग्य समाधानासाठी संपूर्ण जगाची रुची वृद्धिंगत होत असताना आणि आयटीआरए आयुर्वेद शिक्षणाला नवीन स्तरावर नेण्याची तयारी दर्शवित असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे.
* * *
R.Tidke/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1655201)
Visitor Counter : 342