पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

कोरोना आपत्तीच्या काळात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत(पीएमयूवाय) वितरित केलेले सिलेंडर

Posted On: 16 SEP 2020 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 सप्‍टेंबर 2020


गरीब कुटुंबातील प्रौढ महिलांना मोफत स्वयंपाकाच्या गॅसची अनामतरहित जोडणी देण्यासाठी 1-5-2016 पासून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (पीएमयूवाय) सुरू करण्यात आली. 7 सप्टेंबर 2019 रोजी या योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. या योजनेंतर्गत दिल्या गेलेल्या एलपीजी कनेक्शनचा वर्षनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे:-
 

वर्ष

2016-17

2017-18

2018-19

2019-20

एलपीजी कनेक्शन्‍स 

200.3 lakh

155.7 lakh

362.9 lakh

82.64 lakh

 
राज्ये/ केंद्रशासित प्रदेश निहाय देण्यात आलेले रिफिल सिलेंडर आणि  एप्रिल 2020 ते ऑगस्ट 2020 पर्यंत या योजनेतील लाभार्थ्यांसाठी करण्यात आलेला खर्च सोबत जोडलेल्या यादीत देण्यात आला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Annexure

* * *

B.Gokhale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1655009) Visitor Counter : 223