वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

कोरोना विषाणूचा परिणाम

Posted On: 16 SEP 2020 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 सप्‍टेंबर 2020

 

अचानक झालेल्या कोविड -19 च्या प्रादुर्भावामुळे जगातील काही प्रमुख अर्थव्यवस्थांवर गंभीर परिणाम झाला आहे. जगातील सर्व देशांवर त्याचा परिणाम झाला आहे. अर्थशास्त्रीय परिणामामुळे आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये जागतिक सकल राष्ट्रीय उत्पादन कमी होईल असा अंदाज जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तविला आहे.

उद्योगांच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारने अनेक उपाययोजना राबवल्या ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  1. 100 टक्के पत हमीसह तारणमुक्त कर्ज देण्याचा कार्यक्रम, संकटग्रस्त एमएसएमईंसाठी आंशिक पत हमीसह दुय्यम कर्ज योजना, बिगर बॅंक वित्तीय कंपन्याना कर्ज देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी आंशिक पत हमी योजना, गृहनिर्माण वित्त कंपन्या (एचएफसी) आणि मायक्रो फायनान्स संस्था, एमएसएमईमध्ये भांडवली योगदानासाठी फंड ऑफ फंड्स, सवलतीच्या कर्जाद्वारे शेतकऱ्यांना अतिरिक्त आधार, तसेच पथविक्रेत्यांना पतपुरवठा सुविधा (पीएम स्वनिधी) आणि इतर मदत योजना एमएसएमईंसाठी आहेत.
  2. नियामक आणि अनुपालन उपाय: कर भरणे आणि इतर अनुपालनाची अंतिम मुदत वाढविणे, थकीत जीएसटी भरण्यासाठी दंडाच्या व्याज दरात कपात.
  3. आत्मनिर्भर पॅकेजचा भाग म्हणून घोषित केलेल्या संरचनात्मक सुधारणांमध्ये कृषी क्षेत्राच्या नियंत्रणमुक्तीचा, एमएसएमईच्या व्याख्येतील बदलाचा,  नवीन पीएसयू धोरण, कोळसा खाण व्यवसायीकरण, संरक्षण आणि अवकाश क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणुकीची उच्च मर्यादा यांचा समावेश आहे.
  4. ईपीएफ योगदानामध्ये घट, स्थलांतरित कामगारांसाठी रोजगाराची तरतूद; आरोग्य सेवा क्षेत्रातील कामगारांसाठी विमा संरक्षण आणि मनरेगा कामगारांसाठी वेतन वाढ, इमारत आणि बांधकाम कामगारांसाठी मदत, स्वयंसहायता गटांना तारण मुक्त कर्ज.

कोविड -19 च्या आव्हानाला भारताने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. भारतीय उत्पादकांनी पीपीई, N-95/N-99 मास्क, हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध आणि ऑक्सिजन सिलिंडरचे उत्पादन वाढविले आहे.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत लेखी उत्तरात आज ही माहिती दिली.

 

* * *

M.Chopade/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1655161) Visitor Counter : 7


Read this release in: Tamil , English , Manipuri , Telugu