रेल्वे मंत्रालय

रेल्वे डब्यांचे कोविड केअर युनिट्स मध्ये रूपांतर

Posted On: 16 SEP 2020 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 सप्‍टेंबर 2020

 

गृह मंत्रालयाच्या 1 मे 2020 च्या निर्देशांनुसार आणि राज्य सरकारच्या विनंतीनुसार भारतीय रेल्वेने 1 मे 2020 पासून श्रमिक स्पेशल गाड्या सुरू केल्या. प्रवासी सेवा हळूहळू पुन्हा सुरू करण्यासाठी भारतीय रेल्वेने 12 मे 2020 पासून 15 विशेष गाड्यांच्या जोड्या आणि 1 जून 2020 पासून 100 विशेष गाड्यांच्या जोड्या सुरू करून प्रवासी रेल्वे सेवा पुन्हा सुरू केली. त्यानंतर 12 सप्टेंबर 2020 पासून 43 विशेष गाड्यांच्या जोड्या सुरू करण्यात आल्या. सध्या विशेष रेल्वे गाड्या मर्यादित थांब्यांसह सुरु आहेत. कोविड 19 नियमांचे व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी राज्य सरकारच्या सूचना लक्षात घेऊन मर्यादित थांब्यांसह केवळ विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

लॉकडाऊनच्या संकटाच्या काळात भारतीय रेल्वेने 5231 नॉन-एसी आयसीएफ डब्यांना तात्पुरत्या कोविड-19 आयसोलेशन युनिट मध्ये रूपांतरित केले होते. मध्य रेल्वे विभागाने 482 तर पश्चिम रेल्वे विभागाने 410 डब्यांचे अलगीकरण डब्यात रूपांतर केले. संपूर्ण विभागनिहाय स्थिती येथे पाहता येईल.

आवश्यकतेनुसार, 12 सप्टेंबर 2020 रोजी 813 डबे राज्य सरकारांना पुरविण्यात आले आहेत. या डब्यांची अलगीकरण डबे म्हणून असलेली गरज पूर्ण झाल्यावर त्यांना पुन्हा प्रवासी रेल्वे डब्यांमध्ये रूपांतरित केले जाणार आहे.

रेल्वे आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

M.Chopade/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1655207) Visitor Counter : 156