नागरी उड्डाण मंत्रालय

आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोविड -19 चाचणी


विमानतळाच्या प्रवेशद्वारावर प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्यास परवानगी

Posted On: 16 SEP 2020 5:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 सप्‍टेंबर 2020

 

नागरी उड्डाण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर विमानतळाच्या प्रवेशद्वारावर आरटी-पीसीआर चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे.

मार्गदर्शक तत्त्वांच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे-

  1. विमानतळ ऑपरेटर आरटी-पीसीआर चाचणीसाठी नमुना संकलनासह वेटिंग लाउंज सुविधा तयार करेल.
  2. वेटिंग लाउंज परिचालन क्षेत्रापासून दूर असले पाहिजे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या सर्व स्वच्छताविषयक आणि सामाजिक अंतर संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन  केले पाहिजे, अनधिकृत प्रवेश नसावा, वायफाय, एफ अँड बी पर्याय, प्रसाधनगृहे सारख्या प्रवाशांना आवश्यक सुविधा पुरवण्यात याव्यात  , चाचणी आणि विविध सुविधा इत्यादींबाबत पैसे भरण्यासाठी कॅशलेस पर्याय उपलब्ध करुन द्यावा.
  3. विमानतळ ऑपरेटर चाचणीच्या  निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना  वेटिंग लाउंजमध्ये थांबण्यासाठी किंवा चाचणी निकाल उपलब्ध होईपर्यंत अलगीकरणात राहण्यासाठी  नियुक्त केलेल्या हॉटेलवर जाण्यासाठी प्रवाशांना पर्याय प्रदान करावा 
  4. आयसीएमआर आणि एनएबीएलने निर्धारित  केलेल्या प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी नमुना संकलन 
  5. प्रवाशांनी संबंधित संकेतस्थळ  किंवा इतर योग्य ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे आरटी-पीसीआर चाचणीचे ऑनलाइन आरक्षण करावे.  विमानतळांवर चाचणी घेण्याकरिता विमानतळ ऑपरेटरांनी  एक योग्य यंत्रणा ठेवावी 
  6. चाचणीचा निकाल उपलब्ध होईपर्यंत राज्य प्रशासनाने नमुना संकलनसह वेटिंग लाउंज येथे प्रवाशांचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा. 
  7. चाचणीचा निकाल नकारात्मक असल्यास, प्रवाशाला वेटिंग लाउंजमधून बाहेर पडण्याची परवानगी दिली जाईल, आणि कनेक्टिंग फ्लाइट पकडण्यासाठी प्रस्थान करू शकतात . मात्र  निकाल सकारात्मक असल्यास राज्य प्रशासनाकडून  आयसीएमआर प्रोटोकॉलच्या अनुषंगाने  प्रक्रिया केली जाईल.
  8. कोणत्याही प्रवाशाला अनधिकृतरित्या  बाहेर पडता येऊ नये.

नागरी उड्डाण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार ) हरदीपसिंग पुरी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.


* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1655176) Visitor Counter : 204