PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 08 SEP 2020 8:38PM by PIB Mumbai

 

दिल्ली-मुंबई, 8 सप्टेंबर 2020

 

Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 सप्टेंबर 2020 रोजी मध्यप्रदेश येथील पथ विक्रेत्यांशी `स्वनिधी संवाद` साधणार आहेत. कोविड – 19 मुळे व्यवसायावर परिणाम झालेल्या रस्त्यावरील विक्रेत्यांची उपजीविका पूर्ववत करण्यासाठी भारत सरकारने पीएम स्वनिधी योजना 1 जून 2020 रोजी सुरू केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) हायपरसॉनिक तंत्रज्ञान प्रदर्शन वाहनाच्या यशस्वी उड्डाणाबद्दल अभिनंदन केले.  

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :

आक्रमक आणि व्यापक चाचण्यांनी कोविड महामारीविरोधात भारताच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. भारताने एकूण चाचण्यांचा 5 कोटींचा टप्पा आज पार केला.

जानेवारी 2020  मध्ये पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या  प्रयोगशाळेतून फक्त एक चाचणी घेण्यापासून भारताने आतापर्यन्त बरीच मजल मारली असून आज ही एकूण संख्या 5,06,50,128 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 10,98,621 चाचण्या घेण्यात आल्या ज्यातून भारताची वाढीव चाचणी क्षमता दिसून येते.

सरासरी दैनंदिन चाचण्या (आठवड्यानुसार) सातत्याने वाढ दर्शवत आहेत. जुलैच्या तिसर्‍या आठवड्यापासून (निदान प्रयोगशाळांच्या नेटवर्कच्या विस्तारीकरणामुळे प्रति दशलक्ष चाचण्यांना  चालना मिळाली आहे. टीपीएममध्ये 1 जुलै रोजीच्या  6396 वरून आज 36,703 पर्यंत वाढ झाली आहे. देशातील चाचणी प्रयोगशाळेचे नेटवर्क निरंतर बळकट झाले असून आज देशात 1668 प्रयोगशाळा आहेत; सरकारी  क्षेत्रात 1035 प्रयोगशाळा आहेत तर  खाजगी 633 प्रयोगशाळा आहेत. यामध्ये :

• रिअल-टाइम आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा : 846 (सरकारी  467 + खासगी: 379))

• ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : 700 (सरकारी : 534 + खाजगी: 166)

• सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा :122  (सरकारी: 34 + खासगी: 88)3,26,971) ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत  (10,46,470) 3.2 पट वाढ झाली आहे.

 

इतर अपडेट्स:

आरोग्य मंत्रालयाच्या ‘ईसंजीवनी’ टेलिमेडिसिन सेवेने 3 लाख लोकांना दूरध्वनीद्वारे सल्ला दिला आहे. 1.5  लाख दूरध्वनी-सल्ला पूर्ण केल्याबद्दल 9 ऑगस्ट रोजी केंद्रीय आरोग्य आणि  कुटुंब कल्याण मंत्री डॉ.हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. त्यानंतर  एका महिन्यातच  ‘ईसंजीवनी’ टेलिमेडिसिन सेवेने त्यापेक्षा दुप्पट सल्ला सेवेची नोंद केली. यापैकी एक लाख दूरध्वनी-सल्ला सेवा गेल्या 20  दिवसात घेण्यात आल्या. या प्लँटफॉर्मने  23 जुलै 2020 रोजी प्रथम 1,00,000 सल्लामसलत पूर्ण केल्या आणि त्यानंतरच्या 1,00,000  18 ऑगस्ट 2020 रोजी 26 दिवसांच्या कालावधीत  पूर्ण केल्या.

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजचा भाग म्हणून केंद्र सरकारने महिला, गरीब ज्येष्ठ  नागरिक आणि शेतकऱ्यांना 1.70 लाख कोटी रुपयाची  मोफत अन्नधान्य आणि आर्थिक मदत जाहीर केली. या योजनेच्या जलदगती अंमलबजावणीवर केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत 42 कोटीहून अधिक गरीब लोकांना  68,820  कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य प्राप्त झाले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन 2020 मध्ये “कोविड-19 संकटातील आणि त्यानंतरचे शिक्षण आणि साक्षरता अध्यापनावर” विशेषतः शिक्षक आणि अध्यापनशास्त्राच्या बदलणाऱ्या भूमिकेवर लक्ष केंद्रित केले आहे.

मानसिक आरोग्य पुनर्वसनासाठी 24 X 7 कार्यरत राहणारी "किरण" (1800-500-0019) टोल फ्री हेल्पलाइन सेवेचा प्रारंभ केंद्रिय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते  आभासी माध्यमातून करण्यात आला. मानसिक आजार असलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी आणि पाठिंबा दर्शविण्यासाठी या सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. विशेषत्वाने अलिकडे कोविड – 19 महामारीच्या काळातील मानसिक आजाराच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन डीईपीडब्ल्यूडी, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने हा उपक्रम हाती घेतला आहे.

कोविड – 19 महामारीच्या काळात नागरिकांमध्ये कॉन्व्हॅलेसन्ट प्लाझ्मा दान करण्याबाबत जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी गोवा टपाल विभाने ``कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्मा थेरपी``च्या निमित्ताने विशेष कव्हर आणि विशेष कॅन्सलेशन 07 – 07 – 2020 रोजी कॉन्फरन्स हॉल टपाल भवन पणजी येथे प्रकाशित केले आहे. गोवा फिलेटेलिक अँड न्यूमिझमॅटिक सोसायटी या विशेष कव्हर आणि विशेष कॅन्सलेशनचा पुरस्कर्ता आहे.

कोरोना महामारीमुळे सुमारे 6 महिन्यांच्या कालावधीनंतर 9 ऑक्टोबर, 2020 पासून “लोकल ते ग्लोबल” या संकल्पनेतून “हुनर हाट” पुन्हा सुरू होईल आणि स्वदेशी आकर्षक भारतीय खेळण्यांवर लक्ष केंद्रित करेल.

भारतीय रेल्वेने मिशन मोडवर काम करत, सप्टेंबर 2020 मध्ये सहा सप्टेंबर पर्यंत, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत झालेली मालवाहतूक आणि उत्पन्नाचे आकडे ओलांडले आहेत. 6 सप्टेंबर 2020 पर्यंत रेल्वेने 19.19 दशलक्ष टन मालवाहतूक केली. कोविड-19 च्या संकटाचा संधी म्हणून उपयोग करत भारतीय  रेल्वेने अधिक दक्षतेने आपली कामगिरी उत्तम करण्यासाठी पावले उचलली आहेत.

कोविड-19 नंतर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचे स्वप्न साकारण्यासाठी आयएमसी म्हणजेच भारतीय व्यापारी संघ महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले. आयएमसीच्या 114व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात करण्यात आलेल्या ऑनलाइन कार्यक्रमामध्ये जितेंद्र सिंह यांचे प्रमुख पाहुणे भाषण झाले.

देशातील 122 सर्वाधिक प्रदूषित शहरांमधील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ‘निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवाविषयक पहिल्या आंतरराष्ट्रीय दिवसा’निमित्त आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते.

 

महाराष्ट्र अपडेट्स :

महाराष्ट्रात लॉकडाऊनचे निकष शिथिल केल्यानंतर चाचणी उपकरणाचा उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे राज्य सरकारने खासगी प्रयोगशाळांद्वारे घेण्यात आलेल्या आरटी-पीसीआर कोविड -19 चाचण्यांचे दर कमी केले आहेत. सरकारच्या निर्णयानुसार संकलन स्थळांमधून चाचण्यांचे नमुने घेण्याचे शुल्क मागील महिन्यात निश्चित करण्यात आलेल्या 1900 रुपयांवरून 1200 रुपये करण्यात आले आहेत. किओस्क, कोविड-19 केअर कलेक्शन सेंटर, रुग्णालये, दवाखाने, प्रयोगशाळेतील अलगीकरण केंद्रे इथून गोळा केलेल्या नमुन्यांची चाचणी करण्यासाठी आता 2209 रुपयांच्या तुलनेत 1600 रुपये खर्च येईल.

FACTCHECK

***

M.Iyangar/S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1652451) Visitor Counter : 228