दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

गोवा टपाल विभागातर्फे 'विशेष कव्हर आणि विशेष कॅन्सलेशन' प्रकाशित

Posted On: 08 SEP 2020 1:36PM by PIB Mumbai


कोविड – 19 महामारीच्या काळात नागरिकांमध्ये कॉन्व्हॅलेसन्ट प्लाझ्मा दान करण्याबाबत जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी गोवा टपाल विभाने ``कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्मा थेरपी``च्या निमित्ताने विशेष कव्हर आणि विशेष कॅन्सलेशन 07 – 07 – 2020 रोजी कॉन्फरन्स हॉल टपाल भवन पणजी येथे प्रकाशित केले आहे. गोवा फिलेटेलिक अँड न्यूमिझमॅटिक सोसायटी या विशेष कव्हर आणि विशेष कॅन्सलेशनचा पुरस्कर्ता आहे.

समारंभाचे प्रमुख पाहुणे गोवा विभाग, पणजीचे पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदकुमार यांच्या हस्ते आणि प्रमुख अतिथी गोवा येथील वैद्यकीय सल्लागार आणि कार्डिओलॉजिस्ट डॉ. राजेश्वर व्ही नाईक यांच्या उपस्थितीत या विशेष कव्हर आणि विशेष कॅन्सलेशनचे प्रकाशन करण्यात आले. गोवा फिलेटेलिक अँड न्यूमिझमॅटिक सोसायटीचे (जीपीएनएस) अध्यक्ष श्री एम आर रमेश कुमार, सचिव श्री अश्लेष कामत यावेळी प्रकाशन समारंभाला उपस्थित होते. गोवा विभाग, पणजी टपाल कार्यालयाचे वरिष्ठ अधीक्षक डॉ. सुधीर जी. जानखेडे यांनी प्रास्ताविक करताना कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्माचे महत्त्व अधोरेखित केले आणि अलिकडेच बरे झालेल्या रुग्णांकडून ऐच्छिक दान करण्याची गरज विषद केली. विशेष कव्हर आणि विशेष कॅन्सलेशन हे या महामारीच्या दरम्यान पूर्णपणे बरे झालेल्या कोविड-19 रुग्णांकडून कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्मा दान करून कोविड-19 च्या समूळ उच्चाटनाची आवश्यकता अधोरेखित करते.

हे विशेष कॅन्सलेशऩ गोल्डन कॅन्सलेशन स्वरूपात उपलब्ध असेल. विशेष कव्हरवर ``डोनेट प्लाझ्मा – सेव्ह लाइफ्स`` (प्लाझ्मा दान – जीवनदान) असा संदेश अखोरेखित करण्यात आला आहे. विशेष कव्हरची विक्री किंमत रुपये 25 / - इतकी आहे. कॅन्सलेशनसह विशेष कव्हर हे पणजी मुख्य टपाल कार्यालय, तिकीट विभागात 07-09-2020 पासून विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
कोविड -19  महामारीच्या काळात कोविड -19 मधून बरे झालेल्या रुग्णांच्या कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्मा दान करण्याविषयी हे विशेष कव्हर आणि विशेष कॅन्सलेशन लोकांमध्ये जागृती वाढवेल, अशी आशा आहे.

वरिष्ठ अधीक्षक, पोस्ट कार्यालय,
गोवा विभाग,
पणजी 403001

U.Ujgare/S.Shaikh/P.Kor

 

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1652244) Visitor Counter : 129


Read this release in: English