अल्पसंख्यांक मंत्रालय

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाद्वारे आयोजित केला जाणारा “हुनर हाट” ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु होणार


यानंतरचा “हुनर हाट” प्रयागराज येथे 9 ते 18 ऑक्टोबर, 2020 दरम्यान होणार

“लोकल ते ग्लोबल” या संकल्पनेतून पुन्हा सुरु होणाऱ्या  “हुनर हाट” मध्ये यावेळी स्वदेशी आकर्षक खेळण्यांवर लक्ष केंद्रित

देशी खेळणी तयार करणाऱ्या कारागिरांसाठी 30 टक्क्यांहून अधिक स्टॉल्स असतील.

मुख्तार अब्बास नक्वी - स्वदेशी खेळणी तयार करणाऱ्या कुशल कारागिरांसाठी “हुनर हाट” हे बाजारपेठ आणि संधी उपलब्ध करून देणारे एक अतिशय उत्तम व्यासपीठ असेल.

“हुनर हाट” ने गेल्या 5 वर्षात 5 लाखाहून अधिक भारतीय कारागीर, हस्तकलाकार, पाककला तज्ज्ञ आणि त्यांच्याशी संबंधित इतर लोकांना रोजगार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. ”- मुख्तार अब्बास नक्वी

Posted On: 08 SEP 2020 6:21PM by PIB Mumbai

 

कोरोना महामारीमुळे सुमारे 6 महिन्यांच्या कालावधीनंतर 9 ऑक्टोबर, 2020 पासून लोकल ते ग्लोबलया संकल्पनेतून हुनर हाटपुन्हा सुरू होईल आणि स्वदेशी आकर्षक भारतीय खेळण्यांवर लक्ष केंद्रित करेल.

देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात स्थानिक खेळण्यांचा पारंपरिक व वडिलोपार्जित वारसा आहे असे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी खेळण्याच्यावापराच्या आवाहनानंतर नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या स्वदेशी खेळणी उद्योगाला नवचैतन्य प्राप्त झाले आहे.

लाकूड, पितळ, बांबू, काच, कपडा, कागद, चिकणमाती इत्यादींनी बनवलेल्या देशी खेळण्यांच्या विविधतेने देशाचा प्रत्येक कोपरा समृद्ध आहे असे गौरवोद्गार नक्वी यांनी काढले. स्वदेशी उत्कृष्ठ खेळणी तयार करणाऱ्या कुशल कारागीरांना बाजारपेठ आणि संधी उपलब्ध करून देणारे  हुनर हाटहे एक अतिशय उत्तम व्यासपीठ असेल.

नक्वी म्हणाले की, “स्थानिक खेळण्यांना प्रोत्साहन देण्याच्या आवाहनानंतरभारतीय खेळणी उद्योग पुन्हा खेळण्यांच्या बाजारामध्ये आपले वर्चस्व स्थापित करेल. ते म्हणाले की, 9 ऑक्टोबर, 2020 पासून लोकल ते ग्लोबलया संकल्पनेसह हुनर हाटपुन्हा आयोजित केले जाईल. यानंतरचा हुनर हाटप्रयागराज येथे 9 ते 18 ऑक्टोबर, 2020 दरम्यान आयोजित केला जाईल. देशी खेळणी तयार करणाऱ्या कारागिरांसाठी 30 टक्क्यांहून अधिक स्टॉल्स असतील. त्यांना स्वदेशी खेळण्यांच्या आकर्षक वेष्टनासाठी विविध संस्थांकडून मदत दिली जाईल.

गेल्या 5 वर्षात 5 लाखाहून अधिक भारतीय कारागीर, हस्तकलाकार, पाककला तज्ज्ञ आणि त्यांच्याशी संबंधित इतर लोकांना रोजगार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे हुनर हाटलोकप्रिय झाले आहे असे नक्वी

यांनी सांगितले. देशातील दुर्गम भागातील कारागीर व शिल्पकारांना बाजारपेठ आणि संधी उपलब्ध करून देणारे हुनर हाटदुर्मिळ स्वदेशी हस्तकला उत्पादनांचा विश्वासार्ह ब्रँड बनले आहे.

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने आत्तापर्यंत देशभरात दोन डझनहून अधिक हुनर हाटआयोजित केले आहेत जिथे लाखों कारागीर, शिल्पकार यांना या हुनर हाटच्या माध्यमातून रोजगार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. आगामी काळात जयपुर (23 ऑक्टोबर -1 नोव्हेंबर 2020), चंदीगड (7- 15 नोव्हेंबर 2020), इंदूर (21 ते 29 नोव्हेंबर 2020), मुंबई (22 ते 31 डिसेंबर 2020) येथे हुनार हाटआयोजित केले जाईल. हैदराबाद (8 ते 17 जानेवारी 2021), लखनऊ (23 ते 31 जानेवारी 2021), इंडिया गेट, नवी दिल्ली (13 ते 21 फेब्रुवारी 2021), रांची (20 ते 28 फेब्रुवारी 2021), कोटा (5 ते 14 मार्च 2021), सूरत / अहमदाबाद (20 ते 27 मार्च 2021) इत्यादी ठिकाणी हुनर हाटचे आयोजन करण्यात येईल.

यावेळी लोक हुनर हाटउत्पादने डिजिटल व ऑनलाईन पद्धतीने खरेदी करू शकतील असे नक्वी यांनी सांगितले.  केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालय या कारागीर आणि त्यांच्या देशी उत्पादनांची नोंदणी जेएम” (गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस) वर करीत आहे. या कारागीरांनी तयार केलेल्या स्वदेशी उत्पादनांसाठी अनेक निर्यात प्रोत्साहन समित्यांनी मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय बाजारपेठा उपलब्ध करुन देण्यास रस दर्शविला आहे.

हुनर हाटपुन्हा आयोजित करण्यात येणार असल्यामुळे देशभरातील लाखो कुशल कारागीर आणि शिल्पकारांमध्ये आनंद आणि उत्साह दिसत आहे असे नक्वी म्हणाले.

 

Hunar Haat - भारतीय दस्तकारों, शिल्पकारों, कारीगरों एवं... | Facebookhunar-haat-to-restart-from-september-2020-with-the-theme-of-local-to-global

Hunar Haat' to make a comeback in September 2020 after a gap of over  -months due to COVID-19 - ByScoop

M.Iyangar/V.Joshi/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1652381) Visitor Counter : 155