अर्थ मंत्रालय

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज-आतापर्यंतची प्रगती


प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत 42 कोटीहून अधिक गरीब लोकांना  68,820  कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य प्राप्त

Posted On: 08 SEP 2020 6:00PM by PIB Mumbai

 

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजचा भाग म्हणून केंद्र सरकारने महिला, गरीब ज्येष्ठ  नागरिक आणि शेतकऱ्यांना 1.70 लाख कोटी रुपयाची  मोफत अन्नधान्य आणि आर्थिक मदत जाहीर केली. या योजनेच्या जलदगती अंमलबजावणीवर केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत 42 कोटीहून अधिक गरीब लोकांना  68,820  कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य प्राप्त झाले आहे.

पीएम-किसानच्या पहिल्या हप्त्यापोटी 8.94 कोटी लाभार्थींना 17,891 कोटी  रुपयांचे वाटप 

20.65 कोटी (100टक्के) महिला जन धन खातेधारकांच्या खात्यात पहिला हप्ता म्हणून 10,325 कोटी जमा. दुसरा हप्ता म्हणून 20..63  कोटी (100टक्के)महिला जन धन  खातेधारकांच्या खात्यात 10,315 कोटी रुपये जमा. तिसरा हप्ता म्हणून 20.62 कोटी (100टक्के)महिला जन धन  खातेधारकांच्या खात्यात 10,312  कोटी रुपये जमा.

वरिष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांग अशा 2.81 कोटी लोकांना दोन हप्त्यात एकूण 2814.5 कोटी रुपये वितरीत करण्यात आले. सर्व 2.81 कोटी लाभार्थींना दोन हप्त्यात लाभ हस्तांतरित करण्यात आले.

1.82 कोटी बांधकाम मजुरांना 4,987.18 कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य प्राप्त झाले.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत  एप्रिल2020 मध्ये 75.04 कोटी लाभार्थींना 37.52  एलएमटी अन्नधान्य वितरीत करण्यात आले.  मे 2020 मध्ये  74.92 कोटी लाभार्थींना 37.46 एलएमटी अन्नधान्य वितरीत केले . जून 2020 मध्ये  73.24 कोटी लाभार्थींना 36.62 एलएमटी अन्नधान्य वितरीत केले .

ही योजना पाच महिन्यांसाठी नोव्हेंबरपर्यंत  वाढवण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी 98.31 एलएमटी धान्य उचलले आहे. जुलै ’20 मध्ये 36.09 एलएमटी अन्नधान्य 72.18 कोटी लाभार्थ्यांना वितरीत केले गेले आहे, ऑगस्ट ’20  मध्ये 30.22 एलएमटी  धान्य 60.44 कोटी लाभार्थ्यांना वितरित केले,  आणि सप्टेंबर ’20 मध्ये 7 सप्टेंबर, 2020 पर्यंत 1.92 एलएमटी धान्य 3.84 कोटी लाभार्थ्यांना  वितरित केले गेले.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनें तर्गत एप्रिल ते जून  ’20 दरम्यान एकूण 5.43 एलएमटी डाळींचेही 18.8 कोटी लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे. चणाडाळीच्या  वाटपासाठी ही योजना नोव्हेंबर 2020 पर्यंत 5 महिन्यांसाठी वाढविण्यात आली.

आत्मनिर्भर भारत अंतर्गत केंद्र सरकारने स्थलांतरितासाठी दोन महिन्यांसाठी मोफत धान्य आणि चणा वाटप जाहीर केले.  अंदाजे  2.8 कोटी स्थलांतरितांना राज्यांनी अन्नधान्य वितरित केले. ऑगस्ट पर्यंत 5.32 कोटी स्थलांतरितांना 2.67 एलएमटी अन्नधान्य वितरित करण्यात आले. आत्मनिर्भर भारत अंतर्गत 1.64 कोटी स्थलांतरित कुटुंबाना  एकूण 16,417मेट्रिक टन चणा वितरित करण्यात आला, दर महिन्याला सरासरी 82 लाख कुटुंबाना वितरण करण्यात आले.

एकूण 8.52 कोटी सिलेंडरची प्रधानमंत्री उज्वला योजना (पीएमयुवाय)  या योजनेअंतर्गत एप्रिल आणि मे 2020 साठी  नोंदणी करण्यात आली आणि त्यांचे वितरणही झाले. जून 2020 साठी  3.27  कोटी , जुलै 2020 साठी 1.05 कोटी, ऑगस्ट 2020 साठी 0.89 आणि सप्टेंबर 2020 साठी 0.15 कोटी  सिलेंडरचे लाभार्थींना मोफत  वितरणही झाले.

ईपीएफओच्या 36.05 लाख सदस्यांनी परत न करण्याचा एडव्हान्स म्हणून  ईपीएफओ खात्यातून 9,543 कोटी रुपये ऑनलाईन रक्कम काढण्याचा लाभ  घेतला.

24% ईपीएफ  योगदान म्हणून  2476 कोटी रुपये 0.43 कोटी कर्मचार्‍यांना हस्तांतरित करण्यात आले.

मनरेगा - 1 एप्रिल 2020 पासून वाढीव दर अधिसूचित करण्यात आले. चालू वित्तीय वर्षात   195.21  कोटी मानव दिवस कामाची निर्मिती करण्यात आली. मजुरी आणि साहित्य यांची प्रलंबित देणी चुकती करण्यासाठी 59,618 कोटी रुपये राज्यांना जारी करण्यात आले.

डीएमएफ अंतर्गत राज्यांना 30टक्के निधी म्हणजे 3,787 कोटी रुपये खर्च करण्यास सांगण्यात आले असून आतापर्यंत 343.66 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

 

थेट लाभ हस्तांतरण 7/09/2020 पर्यंत

योजना

लाभार्थी

रक्कम

पीएमजेडीवाय महिला खातेधारकांना सहाय्य

पहिला हप्ता - 20.65 कोटी (100टक्के)

दुसरा हप्ता-20.63 कोटी

तिसरा हप्ता -20.62 (100टक्के)

1st Ins – 10,325 कोटी

2nd Ins – 10,315  कोटी

3rd Ins – 10,312 कोटी

 

एनएसएपी (वृद्ध विधवा,दिव्यांग, जेष्ठ नागरीक ) यांना सहाय्य

2.81 cr (100%)

2814 cr

पीएम –किसान अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात आलेली रक्कम

8.94 cr

17891 cr

इमारत आणि इतर बांधकाम मजुरांना सहाय्य

1.82 cr

1.82 cr

ईपीएफओ साठी 24 टक्के योगदान

.43 cr

2476 cr

प्रधानमंत्री उज्वला योजना

1st Ins – 7.43cr

2nd Ins – 4.43 cr

3rd Ins – 1.82 cr

 

9700 crore

एकूण

42.08 कोटी

68820 कोटी

 

M.Iyangar/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1652375) Visitor Counter : 328