गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी  आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या देशाला शुभेच्छा दिल्या


"पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वात आमचे सरकार मुलांचे सबलीकरण आणि 'सर्वांसाठी शिक्षण' या अभियानासाठी अथक प्रयत्न करीत आहे"

"मोदी सरकारच्या एनईपी, बेटी बचाओ-बेटी पढाओ, समग्र शिक्षा अभियान इत्यादी सुधारणांमधून याबद्दलची वचनबद्धता प्रतिबिंबित होते"

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन 2020 मध्ये “कोविड-19 संकटातील आणि त्यानंतरचे शिक्षण आणि साक्षरता अध्यापनावर” लक्ष केंद्रित केले आहे

Posted On: 08 SEP 2020 5:41PM by PIB Mumbai


 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात  आमचे सरकार एनईपी, बेटी बचाओ-बेटी पढाओ, समग्र शिक्षा अभियान यासारख्या सुधारणांच्या माध्यमातून मुलांचे सबलीकरण आणि 'सर्वांसाठी शिक्षण' या अभियानासाठी अथक प्रयत्न करीत आहे.

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन 2020 मध्ये कोविड-19 संकटातील आणि त्यानंतरचे शिक्षण आणि साक्षरता अध्यापनावरविशेषतः शिक्षक आणि अध्यापनशास्त्राच्या बदलणाऱ्या भूमिकेवर लक्ष केंद्रित केले आहे.

ही संकल्पना  आजीवन साक्षरतेच्या दृष्टीकोनातून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करते आणि म्हणूनच तरुण आणि प्रौढ व्यक्तींवर विशेष लक्ष केंद्रित करते. असेही त्यांनी सांगितले.

*****

M.Iyangar/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1652360) Visitor Counter : 198