PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 04 JUL 2020 7:50PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 4 जुलै 2020

Description: Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

केंद्र सरकारचे संस्कृती मंत्रालय, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज, 4जुलै 2020 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आषाढ पौर्णिमा- धर्म चक्र दिन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संबोधन केले. आजच्या दिवशीच भगवान गौतम बुद्धांनी आपल्या पाच तपस्वी शिष्यांना पहिल्यांदा उपदेश दिला होता. उत्तर प्रदेशातल्या वाराणसीजवळ सारनाथमध्ये रसिपाटणा येथे, सध्या ज्या स्थानी डीअर  पार्कआहे, त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी पहिल्यांदा उपदेश केला होता. हा दिवस जगभरातले बौद्ध अनुयायी धर्म चक्र परिवर्तन दिनम्हणून साजरा करतात. यालाच बौद्ध धर्म चक्राचे परिवर्तनअसेही म्हणतात. आज संपूर्ण जग अतिशय विलक्षण आव्हानांचा सामना करीत आहे, त्यावर कायमस्वरूपी तोडगा भगवान बुद्धांच्या आदर्शातून  निघू शकेल, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

बरे होणाऱ्या कोविड-19 च्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोविड-19 चे व्यवस्थापन, प्रतिबंध आणि नियंत्रण यासाठी केंद्र सरकार सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने करत असलेल्या एकत्रित आणि केंद्रित प्रयत्नांमुळे आतापर्यंत, कोविड-19 च्या सक्रीय रुग्णांच्या तुलनेत 1,58,793 रुग्ण बरे झाले आहेत. याचा परिणाम म्हणजे, रुग्ण बरे होण्याच्या दरात वृद्धी होऊन तो 60.18 % झाला आहे.

गेल्या 24 तासांत, एकूण 14,335 कोविड-19 रुग्ण बरे झाले असून, आता बरे झालेल्या रुग्णांचा एकत्रित आकडा 3,94,226 वर पोहोचला आहे.

सध्या 2,35,433 सक्रीय रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत.

देशातील चाचणी प्रयोगशाळांचे जाळे विस्तृत करण्याच्या प्रयत्नांमुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. देशात सध्या 1087 प्रयोगशाळा आहेत; यामध्ये शासकीय क्षेत्रातील 780 प्रयोगशाळा आणि 307 खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.

रियल टाईम आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 584 (सरकारी: 366 + खाजगी: 218)

• TrueNat आधारित चाचणी प्रयोगशाळा: 412 (सरकारी : 381 + खाजगी: 31)

• CBNAAT आधारित चाचणी प्रयोगशाळा: 91 (सरकारी: 33 + खाजगी: 58)

"चाचणी, रुग्ण शोध, उपचार" धोरणाचा भाग म्हणून घेतलेल्या अनेक लोक-केंद्रित उपायांमुळे कोविड-19 चाचणीतील अनेक अडथळे दूर झाले आहेत. राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडून व्यापक चाचणी सुविधा उपलब्ध केल्यामुळे दररोज चाचणी घेतल्या गेलेल्या नमुन्यांमध्ये निरंतर वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 2,42,383 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून, एकूण चाचण्यांची संख्या 95,40,132 इतकी झाली आहे.

इतर अपडेट्स: 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 जुलै 2020 ला लेहमधील रुग्णालयाला दिलेल्या भेटी दरम्यान दिसत असलेल्या सोयी सुविधांबाबत काही ठिकाणी दुर्भाग्यपूर्ण आणि असमर्थनीय शंका घेणारे संदेश पसरताना आढळून आले आहेत.  आपल्या लष्करी दलातील शूर सैनिकांवर सुरु असलेल्या उपचारांबाबत शंका घेणे दुर्दैवी आहे. लष्करी दले आपल्या जवानांना सर्वोत्तम उपचार देतात. या सोयी सुविधा आपत्कालीन विस्ताराचा भाग आहेत. 100 खाटा असलेला हा विस्तारित भाग या रुग्णालय परिसराचाच आहे.

 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी एनईईटी आणि जेईई मेन्स आणि अ‍ॅडव्हान्स परीक्षेच्या नव्या तारखा ऑनलाईन माध्यमातून जाहीर केल्या. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) जेईई आणि एनईईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली .  जेईई मेन्स परीक्षा आता 1 ते 6 सप्टेंबर 2020 दरम्यान घेण्यात येईल आणि जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा  27 सप्टेंबर 2020 रोजी घेण्यात येईल. एनईईटी परीक्षा 13 सप्टेंबर 2020 रोजी घेण्यात येईल, असेही ते पुढे म्हणाले.

 

अणु उर्जा आयोगाचे अध्यक्ष तसेच अणु  ऊर्जा विभागाचे सचिव के एन एन व्यास यांनी भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे विकिरण आणि समस्थानिके तंत्रज्ञान मंडळाचे (बीआरआयटी) अद्ययावत संकेतस्थळ तसेच ब्रिट बंधूनावाचे ग्राहकांशी संवाद साधणारे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन सुरू केले. यावेळी भाभा अणु संशोधन केंद्र बीएआरसीचे संचालक आणि बीआरआयटी मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजितकुमार मोहंती आणि बीआरआयटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप मुखर्जी उपस्थित होते.

 

सध्या सुरु असलेल्या कोविड-19 साथीच्या रोगाच्या काळात, सर्व राज्य/केंद्र शासित प्रदेशांमध्ये प्राधान्याने कोविड आरोग्य सुविधा पुरविण्यावर लक्ष केंद्रित केले असतानाच, बिगर-कोविड अत्यावश्यक सेवांकडे देखील तितकेच लक्ष दिले जात आहे. अहमदाबाद महानगरपालिकेने (एएमसी) धन्वंतरी रथाच्या माध्यमातून शहरातील लोकांच्या दारात बिगर-कोविड अत्यावश्यक आरोग्यसेवा सेवा उपलब्ध करून एक अनोखे आणि नाविन्यपूर्ण उदाहरण स्थापन केले आहे. शहरातील बरीच मोठी रुग्णालये कोविड -19 उपचारासाठी समर्पित आहेत, त्यामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग इत्यादी बिगर-कोविड अत्यावश्यक सेवांशी निगडीत आवश्यक सेवा उपलब्ध व्हाव्यात, हे सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत तसेच बऱ्याच रुग्णालयांमध्ये ओपीडी सेवा बंद असल्यामुळे रुग्णालयात जाऊ न शकणाऱ्या लोकांसाठी देखील ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता (स्वतंत्र प्रभार) मंत्री आर. के. सिंह यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे परिकल्पित आत्मनिर्भर भारत अभियानाच्या ऊर्जा क्षेत्रातील आवश्यकतेवर प्रकाश टाकला. ते राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशातील ऊर्जा मंत्र्यांना व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संबोधित करत होते. ते म्हणाले की, आमच्याकडे ऊर्जा क्षेत्राच्या विविध आवश्यक उपकरणांची उत्पादन सुविधा आणि क्षमता असताना देखील वर्ष 2018-19 मध्ये आमच्या देशाचे वीज उपकरणांसाठीचे आयात बिल सुमारे 71,000 कोटी रुपये होते, ज्यामध्ये चीनकडून 20,000 कोटी रुपयांहून अधिक किंमतीची आयात करण्यात आली होती.

 

भारत सरकारचा कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग, कोविड-19 साथीच्या काळात शेतकरी व शेतीकामांच्या सुविधेसाठी अनेक उपाययोजना राबवीत आहे. खरीप पिक पेरणी क्षेत्रामध्ये लक्षणीय वृद्धी झाली आहे:

 

कोविड-19 च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या लॉकडाउनच्या काळात, केंद्रीय रसायने व खते मंत्रालयाच्या खते विभागाने, शेतकरी वर्गाला, फर्टिलायझर म्हणजेच खतांची विक्रमी विक्री केली. एप्रिल-जून 2020 या काळात POS म्हणजे विक्रीकेंद्रांवरून 111.61 लाख टन खते शेतकऱ्यांना विकली गेली. गेल्या वर्षी याच काळात हा आकडा 61.05 लाख टन इतका होता. त्या तुलनेत यावर्षी 82.81% अधिक विक्री झाली आहे.

 

महाराष्ट्र अपडेट्स :

देशात कोरोना बधितांची संख्या 20 हजारांपेक्षा अधिक संख्येने वाढली असतानाच महाराष्ट्रात 6,364 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे यामुळे एकूण रुग्णसंख्या 1,92,990 इतकी झाली झाली आहे. राज्यात 1.04 लाख हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात 79,911 सक्रिय रुग्ण आहेत.  मुंबई शहरात 1,392 नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत कोरोना बधितांची संख्या काहीशी स्थिरावली असतानाच मुंबई महानगर प्रदेशातील - ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर हे नवीन कोविड हॉट स्पॉट ठरत आहेत.

FACTCHECK

*****

RT/ST/PK

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1636519) Visitor Counter : 211