संरक्षण मंत्रालय
सर्वसाधारण रुग्णालय, लेह येथील सुविधांबाबत भारतीय लष्कराचे स्पष्टीकरण
Posted On:
04 JUL 2020 5:40PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 जुलै 2020 ला लेहमधील रुग्णालयाला दिलेल्या भेटी दरम्यान दिसत असलेल्या सोयी सुविधांबाबत काही ठिकाणी दुर्भाग्यपूर्ण आणि असमर्थनीय शंका घेणारे संदेश पसरताना आढळून आले आहेत.
आपल्या लष्करी दलातील शूर सैनिकांवर सुरु असलेल्या उपचारांबाबत शंका घेणे दुर्दैवी आहे. लष्करी दले आपल्या जवानांना सर्वोत्तम उपचार देतात.
या सोयी सुविधा आपत्कालीन विस्ताराचा भाग आहेत. 100 खाटा असलेला हा विस्तारित भाग या रुग्णालय परिसराचाच आहे.
Covid-19 दरम्यान पालन कराव्या लागणाऱ्या नियमांनुसार सार्वजनिक रुग्णालयाचे काही वॉर्ड्स विलगीकरण कक्षात रूपांतरित करणे आवश्यक होते. हे रुग्णालय कोविड-19 विशेष रुग्णालय म्हणून राखल्यामुळे प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारे आणि दृक्श्राव्य माध्यमाची सोय असलेले सभागृह वॉर्डमध्ये रुपांतरीत करण्यात आले.
जखमी शूर सैनिकांना गलवानमधून इथे आणण्यात आल्यानंतर त्यांना covid-19 साठी राखीव भागापासून दूर ठेवणे आवश्यक होते. लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे हे लष्कराच्या कमांडरांसह जखमी शूर सैनिकांना भेटण्यासाठी याच ठिकाणी आले होते.
***
M. Iyengar/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1636437)
Visitor Counter : 408
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam