अणुऊर्जा विभाग
अणु ऊर्जा विभागाच्या विकिरण आणि समस्थानिके, तंत्रज्ञान मंडळाने सुरू केले नवीन संकेतस्थळ आणि ब्रिट बंधू मोबाइल अॅप
Posted On:
04 JUL 2020 5:24PM by PIB Mumbai
अणु उर्जा आयोगाचे अध्यक्ष तसेच अणु ऊर्जा विभागाचे सचिव के एन एन व्यास यांनी भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे विकिरण आणि समस्थानिके तंत्रज्ञान मंडळाचे (बीआरआयटी) अद्ययावत संकेतस्थळ तसेच ‘ब्रिट बंधू’ नावाचे ग्राहकांशी संवाद साधणारे मोबाईल अॅप्लिकेशन सुरू केले. यावेळी भाभा अणु संशोधन केंद्र बीएआरसीचे संचालक आणि बीआरआयटी मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजितकुमार मोहंती आणि बीआरआयटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप मुखर्जी उपस्थित होते.
.
New website
नवीन संकेतस्थळ
नवीन संकेतस्थळावर URL http://164.100.166.47 याद्वारे प्रवेश केला जाऊ शकतो. 9 जुलै 2020 नंतर हे https://www.britatom.gov.in कार्यरत होईल.
विद्यमान आणि संभाव्य ग्राहकांसाठी सर्वात अचूक, अद्ययावत माहिती प्रदान करण्याबरोबरच अणु तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील ज्ञान आणि कौशल्य सामायिक करण्यासाठी या नवीन संकेतस्थळाची निर्मिती केली गेली आहे. नवीन संकेतस्थळ वेगवान, वापरण्यास सोपे आणि अधिक वापरकर्ता अनुकूल आहे. देशाच्या विविध भागात स्थित ब्रिटच्या प्रादेशिक केंद्रांशी थेट दुवे आहेत; उत्पादने, सेवा आणि ग्राहक समर्थन. विविध किरणोत्सर्गी स्त्रोतांसारखी तांत्रिक माहिती देखील याद्वारे प्रदान केली जाते. नवीन उत्पादन सुरु होण्याबाबतची अद्ययावत माहिती सुद्धा बातमी विभागातील एक भाग आहेत.
ब्रिट बंधू मोबाइल अॅप
ब्रिट बंधू मोबाईल अॅप ग्राहकांना अधिक वापरकर्ता अनुकूल साधनांसह सुसज्ज करण्यासाठी आणि आधुनिक काळातील ई-कॉमर्स मंचाच्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. याच्या अनुप्रयोगामुळे ग्राहकांना त्यांनी मागणी केलेली वस्तू कुठल्या टप्प्यापर्यंत आली आहे याची सद्यस्थिती अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेण्यास सक्षम करते. हे खरेदी अधिकृततेच्या नूतनीकरणासाठी पावत्या आणि स्मरणपत्रांवर अद्ययावत सूचना देखील देते. अॅपची अद्ययावत आवृत्ती काही काळात बाजारात आणली जाईल, ज्यामुळे ग्राहक वस्तूची मागणी नोंदविणे, देयक चुकते करणे तसेच इतर प्रक्रिया ज्या ते आत्ताही ब्रिट च्या संकेतस्थळावर करू शकतात असे ब्रिटच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
वापरकर्ता अभिप्राय आणि अनुभव ceoffice@britatom.gov.in यावर पाठवू शकता. हे अॅप https://play.google.com/store/apps/details?id=com.mindspacetech.BritBandhu वर Google Play Store मध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
ब्रिट अर्थात विकिरण आणि समस्थानिके तंत्रज्ञान मंडळाविषयी अणु उर्जा विभागाचा एक विभाग म्हणून, ब्रिट मोठ्या प्रमाणात समाजातील उद्योग, आरोग्यसेवा, संशोधन आणि कृषी क्षेत्रांना किरणोत्सर्गी समस्थानिके आणि विकिरण तंत्रज्ञानाचा फायदा देण्यावर लक्ष केंद्रित करते. ब्रिट विभाग रेडिओफार्मास्युटिकल्स, लेबल्ड कंपाऊंड्स आणि न्यूक्लियोटाइड्स, सील्ड रेडिएशन सोर्स, गॅमा चेंबर्स, ब्लड इरेडिएटर्स आणि रेडिओग्राफी एक्सपोजर उपकरणांच्या स्वरूपात उत्पादनांची विस्तृत यादी प्रदान करतो. खाजगी क्षेत्रात विकिरण प्रक्रिया प्रकल्प स्थापित करण्यासाठी प्रकल्प सल्लागार सेवे व्यतिरिक्त समस्थानिके वापर सेवा, किरणोत्सर्ग विश्लेषण सेवा, कॅलिब्रेशन आणि डॉसिमेट्री सेवा आणि विकिरण प्रक्रिया सेवा देखील विकिरण आणि समस्थानिके तंत्रज्ञान मंडळ पुरविते.
****
B.Gokhale/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1636431)
Visitor Counter : 947