कृषी मंत्रालय

भारत सरकारच्या कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभागातर्फे, कोविड-19 साथीच्या रोगाच्या काळात शेतकरी व शेतीकामांच्या सुविधेसाठी अनेक उपाययोजना


खरीप पिकाच्या पेरणी क्षेत्रामध्ये लक्षणीय वृद्धी

Posted On: 03 JUL 2020 11:20PM by PIB Mumbai

 

भारत सरकारचा कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग, कोविड-19 साथीच्या काळात शेतकरी व शेतीकामांच्या सुविधेसाठी अनेक उपाययोजना राबवीत आहे.

खरीप पिका खालील पेरणी क्षेत्रामध्ये लक्षणीय वृद्धी झाली असून सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे:

उन्हाळी पिकांच्या पेरणी खालील क्षेत्र:

तांदूळ: मागील वर्षीच्या याच कालावधीतील उन्हाळी तांदळाच्या 49.23 लाख हेक्टर पेरणी क्षेत्राशी तुलना करता यावर्षी या क्षेत्रात वाढ होऊन ते अंदाजे 68.08 लाख हेक्टर झाले आहे. 

डाळी: गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे 36.82 लाख हेक्टर क्षेत्रावर डाळींची पेरणी केली असून गेल्यावर्षी याच हंगामात 9.46 लाख हेक्टरवर डाळींची पेरणी करण्यात आली होती.

तृणधान्ये: मागील वर्षीच्या तृणधान्यांच्या 35.20 लाख हेक्टर पेरणी क्षेत्राशी तुलना करता यावर्षी या क्षेत्रात वाढ होऊन ते अंदाजे 70.69 लाख हेक्टर झाले आहे. 

तेलबिया: यावर्षी सुमारे 109.20 लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची पेरणी करण्यात आली असून गेल्यावर्षी याच हंगामात 33.63 लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची पेरणी केली होती.

ऊस : मागील वर्षीच्या उसाच्या 49.86 लाख हेक्टर पेरणी क्षेत्राशी तुलना करता यावर्षी या क्षेत्रात वाढ होऊन ते अंदाजे 50.62 लाख हेक्टर झाले आहे. 

ताग व मेस्टा: यावर्षी सुमारे 5.89 लाख हेक्टर क्षेत्रावर ताग व मेस्टाची पेरणी करण्यात आली असून गेल्यावर्षी याच हंगामात 6.80 लाख हेक्टर क्षेत्रावर ताग व मेस्टाची पेरणी केली होती.

कापूस: यावर्षी सुमारे 91.67 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी करण्यात आली असून गेल्यावर्षी याच हंगामात 45.85 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी केली होती.

पेरणी क्षेत्राच्या तपशीलवार माहितीसाठी लिंकवर क्लिक करा

***

S.Pophale/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1636378) Visitor Counter : 233