PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 13 MAY 2020 8:10PM by PIB Mumbai

 

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

दिल्‍ली-मुंबई, 13 मे 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राला संबोधन केले. कोरोना विषाणूमुळे भारतातही अनेक कुटुंबांनी आपले आप्तेष्ट गमावले आहेत याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. मात्र त्याच वेळी कोरोनाचे हे मोठे संकट भारतासाठी स्वावलंबनाची मोठी संधी घेऊन आले असल्याचा विश्वास त्यांनी जनतेला दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त परिचारिकाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. “आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन हा आपली पृथ्वी निरोगी ठेवण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या असामान्य परिचारिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशेष दिवस आहे. सध्या त्या कोविड-19 वर मात करण्यासाठी अतुलनीय काम करत आहेत. आपण परिचारिका आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अत्यंत आभारी आहोत.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

आतापर्यंत देशात 74,281 कोविड-19 केसेस नोंद झाल्या आहेत तर 24,386 बरे झाले आहेत आणि 2,415 मृत्यू झाले आहेत. गेल्या 24 तासात 3,525 केसेस नोंद झाल्या.  आजवर कोविड-19 साठी 18.5 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत आज खालील माहिती दिली.

  • उद्योगधंदे तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी तीन लाख कोटी रुपयांचे आपत्कालीन खेळते भांडवल पुरवण्यात येईल
  • अडचणीत असलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी वीस हजार कोटींची मदत
  • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 50 हजार कोटींची भांडवल गुंतवणूक
  • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांची व्याख्या बदलण्यात येणार तसेच इतरही उपायोजना
  • 200 कोटी रुपये पर्यंतच्या सरकारी निविदांसाठी जागतिक कंपन्यांना निविदा भरण्यास परवानगी नसेल
  • व्यवसाय तसेच संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी निर्वाह निधी मध्ये आणखी तीन महिन्यांची मदत
  • कर्मचारी निर्वाह निधीतील कर्मचाऱ्यांचे आणि मालकाचे अंशदान पुढच्या तीन महिन्यांसाठी 12 टक्‍क्‍यांवरून 10 टक्के
  • बिगर बँकिंग वित्तीय संस्थांसाठी 30 हजार कोटी रुपयांचा रोकड निधी
  • बिगर बँकिंग वित्तीय संस्थांसाठी आणि म्युच्युअल फंड यांसाठी 45 हजार कोटी रुपयांची क्रेडिट गॅरंटी योजना
  • वीज वितरण कंपन्यांसाठी  90 हजार कोटी रुपयांची रोकड सुलभता मदत
  • बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत प्रकल्पांना सहा महिन्यांची मुदतवाढ

 

इतर अपडेट्स :

महाराष्ट्र अपडेट्स

1026 नव्या केसेस 339 बरे झालेले रुग्ण आणि 53 मृत्यू . महाराष्ट्रात नोंदवले गेले. राज्यातील एकूण रुग्ण संख्या 24,427 झाली आहे. यादरम्यान महाराष्ट्र सरकारने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या वीस तुकड्या केंद्राकडे मागितल्या आहेत ज्या राज्यातील थकलेल्या पोलिस दलाला मदत करतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना ही गोष्ट नमूद केली होती

 

FACT CHECK

* * *

RT/MC/SP/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1623647) Visitor Counter : 235