गृह मंत्रालय
एक संकल्प, एक लक्ष्य –आत्मनिर्भर भारत: अमित शाह
देशभरातील CAPF च्या सर्व कॅन्टीन्स आणि दुकानांमध्ये 1 जून 2020 पासून केवळ स्वदेशी उत्पादने विकली जातील
Posted On:
13 MAY 2020 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मे 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला स्वयंपूर्ण करण्याचे आणि भारतातच तयार होणारी उत्पादने वापरण्याचे आवाहन देशवासियांना केले. हे आवाहन म्हणजे भविष्यात भारताला जागतिक नेतेपद मिळवून देण्याचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ आहे, असे मत गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले.
https://twitter.com/AmitShah/status/1260472519347310595?s=20
याच दिशेने, केंद्रीय गृहमंत्रालयाने एक निर्णय घेतला असून, त्यानुसार, CAPF म्हणजेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या देशभरातील कॅन्टीन आणि दुकानांमध्ये येत्या 1 जून 2020 पासुन केवळ स्वदेशी उत्पादनेच विकली जाणार आहेत. या उत्पादनांची एकून किंमत सुमारे 2800 कोटी इतकी असेल. या निर्णयामुळे, 10 लाख CAPF कर्मचाऱ्यांचे सुमारे 50 लाख कुटुंबीय आता केवळ स्वदेशी उत्पादनेच वापरतील.
गृहमंत्र्यानी देशातील जनतेलाही आवाहन केले असून, “जितके शक्य आहे तेवढी स्वदेशी उत्पादने वापरा आणि इतरांनाही स्वदेशी उत्पादने वापरण्यास प्रोत्साहन द्या. हा मागे हटण्याचा काळ नाही, तर या संकटातून आपल्यासाठी संधी निर्माण झाली आहे.” असे म्हटले आहे.
जर प्रत्येक भारतीयाने देशातच तयार झालेली उत्पादने वापरण्याची शपथ घेतली, तर देश येत्या पाच वर्षातच स्वयंपूर्ण होऊ शकेल, असेही शाह यांनी सांगितले.
देशातील लोकांना आवाहन करताना गृहमंत्री म्हणाले की, ‘भारताला स्वयंपूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी भारतीय उत्पादने वापरून पंतप्रधानांचे हात मजबूत करायला हवेत’.
* * *
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
(Release ID: 1623565)
Visitor Counter : 266
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam