सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
एमएसएमई, ग्रामोद्योग आणि कुटीर उद्योग क्षेत्रासाठी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजचे नितीन गडकरी यांच्याकडून स्वागत; यामुळे हे क्षेत्र नवी उंची गाठेल असा विश्वास केला व्यक्त
Posted On:
12 MAY 2020 11:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मे 2020
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज संध्याकाळी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे स्वागत केले. ते म्हणाले, या ऐतिहासिक पॅकेजच्या माध्यमातून पंतप्रधानांनी एमएसएमई, ग्रामोद्योग आणि कुटीर उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण केल्या आहेत.
मुबलक संसाधने, उत्तम तंत्रज्ञान आणि कच्च्या मालामुळे भारत लवकरच सर्व क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर बनू शकेल असे गडकरी म्हणाले. जागतिक अर्थव्यवस्थेत पंतप्रधानांनी भारतासाठी महान आर्थिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहिले आहे असे ते म्हणाले. कोविड-19 साथीच्या रोगामुळे आलेली आर्थिक मंदीकडे एक संधी म्हणून पाहून आपण देशाला पुढे नेण्यासाठी सकारात्मकता आणि आत्मविश्वास कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे गडकरी म्हणाले.
ते म्हणाले, पंतप्रधानांनी जाहीर केलेले हे पॅकेज देश कायम स्मरणात ठेवेल. 11 कोटी पेक्षा अधिक लोकांना रोजगार देणाऱ्या आणि जीडीपीच्या सुमारे 29 टक्के योगदान देणार्या या क्षेत्राला पंतप्रधानांनी केलेलं सहकार्य या क्षेत्रातील सर्व हितधारक कधीही विसरू शकणार नाहीत. या पॅकेजच्या सहाय्याने एमएसएमई, ग्रामोद्योग आणि कुटीर उद्योग क्षेत्र नवी शिखरे गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
* * *
M.Jaitly/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
(Release ID: 1623495)
Visitor Counter : 173