• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लॉकडाऊन काळात एफसीआयने केलं राज्य/केंद्रशासित प्रदेशांना 160 लाख मे.टन अन्नधान्याचं वाटप


एनएफएसए आणि पीएमजीकेवाय अंतर्गत आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध आहे

Posted On: 13 MAY 2020 6:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 मे 2020

 

लॉकडाऊनच्या काळात गहू आणि तांदळाचा अखंड पुरवठा देशभरात करण्याची तजवीज भारतीय अन्न महामंडळाकडे आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत, केंद्र सरकार लाभार्थ्‍यांना दर महिन्‍याला 5 किलो धान्‍य पूरवत आहे तसेच प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेअंतर्गत 81.35 कोटी लोकांना आणखी 5 किलो धान्‍य पूरवत आहे. 

देशाची गरज भागविण्यासाठी एफसीआयकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे. 1 मे 2020 रोजी 642.7 लाख मेट्रीक टन इतका धान्यसाठा उपलब्ध होता, ज्यापैकी 285.03 लाख मेट्रिक टन तांदूळ आणि 357.7 लाख मेट्रिक टन गहू होते. 12 मे2020 पर्यंत, 159.36 लाख मेट्रिक टन अन्नधान्य विविध योजनांच्या अंतर्गत वाटप करण्यात आले आहे. एनएफएसए अंतर्गत राज्य सरकारांनी 60.87 लाख मेट्रिक टन अन्नधान्य उचलले असून, जवळपास दीड महिना पुरेल एवढे किंवा त्या बरोबरीत आहे. शिवाय, एकूण 120 लाख मेट्रिक टन अन्नधान्य वाटपाच्या तुलनेत, पीएमजीकेएवाय अंतर्गत एकूण 79.74 लाख मेट्रिक टन धान्य उचलण्यात आले आहे, जे दोन महिन्याच्या वाटपा इतके समतुल्य आहे. लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्राने एनएफएसए अंतर्गत 3.15 लाख मेट्रिक टन गहू आणि 1.35 लाख मेट्रिक टन तांदूळ घेतले तर पीएमजीकेएवाय अंतर्गत 4.62 लाख मेट्रिक टन तांदूळ घेतले, म्हणजे एकूण 5.97 लाख मेट्रिक टन तांदूळ उचलले आहेत. आणि गहू व तांदूळ मिळून 9.12 लाख मेट्रिक टन अन्नधान् उचलेले आहे.

लॉकडाऊनच्या काळात (25.03.2020 ते 12.05.2020) एनएफएसए आणि पीएमजीकेएवाय अंतर्गत राज्यांनुसार अन्नधान्य घेतलेली सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

 

* * *

B.Gokhale/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com


(Release ID: 1623611) Visitor Counter : 223


Link mygov.in