पंतप्रधान कार्यालय
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनी पंतप्रधानांनी परिचारिकाविषयी कृतज्ञता केली व्यक्त
Posted On:
12 MAY 2020 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मे 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त परिचारिकाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
“आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन हा आपली पृथ्वी निरोगी ठेवण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या असामान्य परिचारिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशेष दिवस आहे. सध्या त्या कोविड-19 वर मात करण्यासाठी अतुलनीय काम करत आहेत. आपण परिचारिका आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अत्यंत आभारी आहोत.
पंतप्रधान म्हणाले, “फ्लॉरेन्स नाइटिंगेलपासून प्रेरणा घेऊन मेहनत करणारा आपला परिचारिका वर्ग करुणेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. आज आम्ही परिचारिकांच्या कल्याणासाठी काम करण्याच्या आणि काळजी घेणाऱ्या व्यवस्थांची कोठेही कमतरता भासू नये यासाठी या क्षेत्रातील कार्याकडे अधिक लक्ष देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो. ”
G.Choippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1623345)
Visitor Counter : 280
Read this release in:
Manipuri
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam