PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र


कोविड-19 ची रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा काळ लॉकडाउनच्या आधीच्या 3.4 दिवसावरून आता 12 दिवसापर्यंत वाढला आहे : आरोग्य मंत्रालय

मजूर किंवा स्थलांतरितांकडून प्रवास भाडे आकारण्याबाबत केंद्र सरकारने कधीही काहीही म्हंटलेलं नाही, 85% खर्च भारतीय रेल्वे तर 15% खर्च राज्य सरकार करणार: आरोग्य मंत्रालय

Posted On: 04 MAY 2020 8:04PM by PIB Mumbai

 

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

दिल्‍ली-मुंबई, 4 मे 2020

 

काही अपरिहार्य कारणांमुळे परदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना केंद्र सरकार टप्प्याटप्प्याने भारतात आणेल. याकरिता विमाने आणि जहाजांची मदत घेण्यात येईल. भारतीय दूतावास आणि वकिलाती यांनी अशा भारतीयांची सूची बनवण्याचे काम सुरू केले आहे.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कोविड-19 संदर्भात, खासगी क्षेत्र, सामाजिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय संघटनांशी समन्वय साधण्याची जबाबदारी असणाऱ्या 'सक्षम गट-6' चे अध्यक्ष अमिताभ कांत, यांनी आज या गटाच्या कामाच्या प्रगतीबाबत सादरीकरण केले. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल, गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या श्रीमती पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी कोविड-19  घडामोडींवरील माहिती दिली.

  • केंद्रीय गृहमंत्रालयाचा नियंत्रण कक्ष आठवड्याचे सातही दिवस, चोवीस तास कार्यरत असून, 3 मे 2020 पर्यंत, जवळपास 12 हजार तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे.
  • आंतरराज्यीय मालवाहतूक करण्यात काही अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी असे निर्देश गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना दिले आहेत. लॉकडाऊनशी संबंधित काही तक्रारी असल्यास, चालक/वाहतूकदार  गृहमंत्रालयाचा नियंत्रण कक्ष 1930 आणि NHAI चा मदतक्रमांक 1033  वर संपर्क साधू शकतात
  • पोलीस आणि संरक्षण दलांमध्ये कोविड-19 चा संसर्ग वाढत चालल्याचे लक्षात घेत, केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना  सल्लासूचना जारी करत, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या, 'कामाच्या ठिकाणी सुरक्षा'विषयक मार्गदर्शक सूचनांकडे लक्ष वेधले आहे.केंद्रीय गृहमंत्रालय.
  • आजपासून सुरु झालेल्या लॉकडाऊन-3 मधल्या तरतुदींचा गृह मंत्रालयाच्या सहसचिवांकडून पुनरुच्चार
  • कोविड19 चे देशभरातील एकूण रुग्ण 42,533. सध्या उपचार घेत असलेले सक्रिय रुग्ण 29,453. गेल्या 24 तासांत 2,553 नवे रुग्ण तर 1,074 रुग्ण (एका दिवसातील सर्वाधिक संख्या) बरे. एकूण बरे झालेले रुग्ण 11,706, रुग्ण बरे होण्याचा दर 27.52%.
  • परिणामाचे गुणोत्तर, जे कोविड-19 च्या बंद झालेल्या प्रकरणांची स्थिती दर्शविते, म्हणजे एकतर रोगमुक्त झालेल्या किंवा बळी गेलेल्यांची संख्या,  ते गुणोत्तर सुधारले आहे. 17 एप्रिलला ते 80:20 होते, तर आज ते 90:10 इतके आहे.
  • लॉकडाऊन टप्याटप्याने शिथिल केला जात आहे, मात्र, कठोर प्रतिबंधित उपाययोजना, प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन, संक्रमण रोखणे आणि नियंत्रण सुरु ठेवणे गरजेचे आहे.
  • कोविड19 सारख्या जागतिक संसर्गजन्य आजारांचा इतिहास पाहिल्यास, हे लक्षात घ्यायला हवे की जिथे सामाजिक अंतराचे नियम पाळले नाहीत, जनतेच्या सार्वजनिक वाहतूकीला परवानगी दिली गेली, आणि नियमात शिथिलता देण्यात आली, तेव्हा संक्रमणाचा धोका अधिक वाढला- आरोग्य मंत्रालय
  • अशी परिस्थिती टाळण्यासाठी व लॉकडाउनमधून झालेल्या सकारात्मक परिणामांचा प्रभाव कायम राखण्यासाठी, लॉकडाउनमधून मोकळीक मिळत जाताना आपण आपले सामाजिक उत्तरदायित्व समजून घेतले पाहिजे व सर्व प्रोटोकॉल तसेच सूचनांचे तंतोतंत पालन केले पाहिजे
  • यातली जी सूक्ष्म सीमारेषा आहे, ती आपण पाळायला हवी. आपण बेफिकीर राहिलो तर कोविड19 चे नवे रुग्ण तयार होतील. तसेच ज्या जिल्ह्यात आतापर्यंत रुग्ण नव्हते, तिथेही रुग्ण आढळले तर आपल्याला नव्याने निर्बंध घालावे लागतील.
  • आता यापुढे  'सामान्य परिस्थितीची' वेगळी व्याख्या राहणार आहे, आपल्याला आता सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे/चेहरा झाकणे ही अनिवार्य सवय बनवावी लागणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रांच्या बाहेरही सर्व प्रतिबंधक उपाययोजना पाळाव्या लागणार आहेत.
  • नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कोविड-19 संदर्भात, खासगी क्षेत्र, सामाजिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय संघटनांशी समन्वय साधण्याची जबाबदारी असणाऱ्या 'सक्षम गट-6' चे अध्यक्ष अमिताभ कांत, यांनी आज या गटाच्या कामाच्या प्रगतीबाबत सादरीकरण केले.
  • या गटाने 92,000 पेक्षा अधिक अशासकीय संस्था / नागरी संस्थांच्या सहभागाला चालन दिली आहे. हॉटस्पॉट हेरणे, तेथे स्वयंसेवक नेमणे,  स्थलांतरित मजुरांना व अन्य गरजूंना मदत करणे, यासाठी राज्ये व जिल्ह्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करून, त्यांना या गटाने या कार्यात सहभागी करून घेतले आहे. -'सक्षम गट-6' चे अध्यक्ष.
  • अधिकारप्राप्त गट 6 चे अध्यक्ष आणि नीती आयोगाचे कार्यकारी प्रमुख अमिताभ कांत यांनी यावेळी, त्यांचा गट सामाजिक संस्था,स्वयंसेवी संस्था, उद्योग आणि आंतरराष्ट्रीय संस्थासोबत कोविड19 चा सामना करण्यात आणि विविध पातळ्यांवर विशेष कृती आराखडे कसे राबवित आहे, याबाबत, माहिती दिली.
  • पुढील टप्प्यात कोविड-19 संबंधीच्या सामाजिक पूर्वग्रहांविरोधात, तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी चळवळ उभारण्याच्या कामी हा गट, नागरी संस्था / अशासकीय संस्थांना, सहभागी करून घेईल.- 'सक्षम गट-6' चे अध्यक्ष
  • देशातील 112 सर्वाधिक मागास जिल्ह्यांतल्या लक्षावधी लोकांचे जीवनमान दउंचावण्यात, नीती आयोगाद्वारे संचलित 'आकांक्षी जिल्हा अभियान' अत्यंत यशस्वी ठरले आहे.सध्या या सर्व जिल्ह्यात मिळून ~610 रुग्ण आहेत, जे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत 2% टक्के कमी आहे-- अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट 6
  • विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांच्या वाहतुकीसाठी संबंधित राज्यांच्या विनंतीनुसार विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जात आहेत.  या मजूर किंवा स्थलांतरितांकडून प्रवास भाडे आकारण्याबाबत केंद्र सरकारने कधीही काहीही म्हंटलेलं नाही. या वाहतुकीचा 85 % खर्च भारतीय रेल्वे तर 15 % खर्च राज्य सरकार करणार आहे.
  • प्रत्येक जण भागधारक आहे. आपल्या सामाजिक वचनबद्धता व उत्तरदायित्वाचा भाग म्हणून, आपण कोविड-19 च्या फैलावास अटकाव करण्याच्या दृष्टीने, शारीरिक अंतर राखणे व अन्य प्रतिबंधक उपायांचे पालन केले पाहिजे.- केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय.
  • कोविड-19 ची रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा काळ वाढला आहे. लॉकडाउनच्या आधी तो 3.4 दिवस इतका होता, तर आता तो 12 दिवस झाला आहे. लॉकडाउन आणि क्षेत्रबंदीच्या प्रयत्नांना यश येत आहे. आता हा काळ वाढविण्यासाठी, आणखी सुधारणा करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. -संयुक्त सचिव
  • आज देशात कोविड19 साठी 426 चाचणी प्रयोगशाळा आहेत. त्यापैकी 315 सरकारी तर 111 खाजगी आहेत. काल 57,474 चाचण्या करण्यात आल्या. आपण गरजेनुसार हळूहळू आपल्या चाचण्यांची क्षमता वाढवली आहे. नमुन्यांच्या निकषानुरूप चाचण्यांची संख्याही वाढते आहे.
  • महत्त्वपूर्ण सामाजिक क्षेत्रांमध्ये विविध नागरी संस्था व अशासकीय संस्थांकडे असलेली कार्यक्षमता, तसेच समुदायांशी संवाद साधण्यासाठी त्यांची असलेली पोहोच,  या दोन्हींचा उपयोग कोविड-19 विरोधातील लढाईत करून घेण्यासाठी 'सक्षम गट -6' ने अशा 92,000 संस्थांच्या नेटवर्कला चालना दिली आहे.

 

इतर अपडेट्स :

  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस विकतांना अडचणी येत असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने सर्व शेतकऱ्यांना ग्वाही दिली आहे, की भारतीय कापूस महासंघ आणि राज्यातील कापूस उत्पादक पणन महासंघ हमीभावानुसार कापसाची खरेदी करायाला तयार असून राज्यात या हमीदराने कापसाची खरेदी केली जात आहे.
  • खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या (केव्हीआयसी) निदर्शनाला आले आहे की काही अप्रामाणिक उद्योग कंपन्या ‘खादी इंडिया’चा नोंदणीकृत ट्रेडमार्क लोगो फसव्या पद्धतीने वापरून वैयक्तिक संरक्षक अंगरखे (पीपीई) किट्स तयार करून विकत आहेत. केव्हीआयसीने स्पष्ट केले आहे कि आतापर्यंत त्यांनी बाजारात विक्रीसाठी पीपीई किटस आणलेले नाहीत.
  • केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्य आणि कुंटुंब कल्याण तसेच पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज डीएसटीच्या 50 व्या स्‍थापना दिवसाच्या निमित्ताने व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व स्वायत्त संस्था (एआय) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी)च्या अखत्यारीतील कार्यालय प्रमुखांबरोबर चर्चा केली. प्रामुख्याने कोविड-19 चे उच्चाटन करण्यासाठीच्या उपाययोजनांवर बैठकीत चर्चा झाली. कोविड-19 वर आधारित मल्टीमीडिया मार्गदर्शक 'कोविड कथा' याचे लोकार्पणही हर्षवर्धन यांनी यावेळी केले.
  • आदिवासी कारागिरांना होणाऱ्या अभूतपूर्व त्रासाच्या पार्श्वभूमीवर, आदिवासी जमात आणि आदिवासी कारागीर यांना पाठबळ देण्यासाठी सरकार त्वरित विविध उपक्रम राबवीत आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालयाने याआधीच ‘आदिवासी उत्पादनांच्या विकास आणि विपणनासाठी संस्थात्मक पाठबळ’ या योजनेंतर्गत किरकोळ वनोत्पादनाच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ केली आहे.
  • रक्तदान हेच जीवनदान आहे. रक्तदानाप्रति जागरुकता वाढवणे जरुरीचे आहे. तसेच गरजूंना वेळेवर, सुरक्षित आणि योग्य रक्त मिळावे यासाठी नेहमी तयार असले पाहिजे. आपण सर्वांनीच रक्तदान करायला हवे,  मग ते कुणाहीसाठी असो. असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी नवी दिल्लीत भारतीय रेड क्रॉस सोसायटी इमारतीत  आयोजित रक्तदान शिबिरात केलं.
  • कोविड-19 मुळे देशव्यापी लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संघ लोकसेवा आयोगाने आज विशेष बैठक घेतली. निर्बंधांच्या मुदतवाढीची दखल घेत आयोगाने निर्णय घेतला की सध्या परीक्षा आणि मुलाखत पुन्हा घेणे शक्य नाही. त्यामुळे 31 मे 2020 रोजी होणारी नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2020 स्थगित करण्यात आली आहे.
  • आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने तब्बल 20 केंद्रीय सार्वजनिक आरोग्य पथके स्थापन केली असून देशातील कोविड-19 च्या सर्वाधिक रुग्णांची नोंद असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये या पथकांना पाठविण्यात आले आहे.
  • देशाच्या एकतेला आणि अखंडत्वाला प्रोत्साहन देण्याच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल, भारत सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावे सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून “सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार” हा पुरस्कार प्रदान करण्याचे योजिले आहे. ऑनलाइन नामांकने मागविण्याची मुदत 30 जून 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
  • केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोविड-19 स्थितीचा आढावा घेण्यासाठी भारतातील सर्वात जुन्या आणि प्रस्थापित लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयाला (एलएचएमसी) भेट दिली. रुग्णालयातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन एलएचएमसी आणि सहयोगी रुग्णालये-श्रीमती सुचेता कृपलानी रुग्णालय (एसएसकेएच) आणि कलावती सरण मुलांचे रुग्णालय (केएससीएच) पुरेसे अलगीकरण वॉर्ड आणि बेडसह समर्पित 30-बेडचे कोविड-19 रुग्णालय म्हणून कार्यरत आहे
  • निम्न वन उत्पादन गोळा करण्याचा हा हंगाम असल्याने आदिवासी व्यवहार मंत्रालयाने सर्व राज्यांना सल्ला दिला आहे की कोविड-19 ने निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निम्न वन उत्पादनांच्या  खरेदीची कामे जलदगतीने करावीत.
  • एअर इंडिया,अलायन्स एअर, भारतीय वायू दल आणि काही खाजगी विमान कंपन्यांनी  मिळून लाईफलाईन उडानच्या 430 विमानफेऱ्या केल्या असून आतापर्यंत यापैकी 252 विमानफेऱ्या एअर इंडिया आणि अलायन्स एअर कार्गोने केल्या आहेत त्यातून 795.86 टन मालाची ने-आण करण्यात आली.या फेऱ्या नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने नियोजित केल्या असून त्यातून कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी लागणाऱ्या गरजेच्या वैद्यकीय वस्तूंची देशातील दुर्गम भागात नेआण केली गेली.आतापर्यंत लाईफलाईन उडान ने 4,21790 किलोमीटर हवाई अंतर पार केले आहे.
  • त्यासोबतच, संपूर्ण मानवतेच्या हितासाठी, कोरोना योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता, पहिल्या फळीत भक्कमपणे उभे राहून लढा देत आहेत. या सर्व योद्ध्यांचे साहस, निस्वार्थ त्याग आणि कोरोनाच्या कर्तव्याप्रती समर्पण भावना, या सगळ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती यांनी मानवंदना अर्पण केली.
  • उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात सब एरियाने  (उमंग) 03 मे 2020  रोजी नागपूरमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात कोविड -19 योद्धयांप्रति एकजुटीची भावना व्यक्त केली. पोलिस स्मारक, जीएमसी आणि आयजीएमसी रुग्णालये आणि अशा अन्य  ठिकाणी डॉक्टर्स , परिचारिका, पोलिस, निमवैद्यकीय कर्मचारी , सफाई कामगार आणि देशातील जनतेच्या सेवेसाठी जीव धोक्यात घालून अत्यावश्यक  सेवा पुरविणाऱ्यांसह सर्व आघाडीच्या कोविड -19 योद्धयांच्या सेवेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
  • देशभर कोरोना योद्ध्यांना भारतीय सैन्यदलाकडून मानवंदना देण्यात आली. त्याचाच भाग म्हणून गोव्यात नौदलाच्या आयएनएस हंसाने गोवा वैद्यकीय महाविद्यालय, कॉटेज हॉस्पीटल चिखली आणि ईएसआय हॉस्पीटल, मडगाव याठिकाणी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली. नौदलाकडून कोरोना योद्ध्यांप्रती धन्यवाद व्यक्त केला तसेच या रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप केली.
  • आयकर विभाग आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क विभागाने करदात्यांना जलद परतावा मिळण्याच्या प्रलोभनांना बळी पडून कोणत्याही बनावट लिंकवर क्लिक न करण्याचा इशारा दिला आहे. असे निदर्शनाला आले आहे की, “प्रिय करदात्यांनो, कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे केंद्र सेकाराने जीएसटी परताव्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली आहे. तुमच्या परताव्याचा दावा करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा http://Onlinefilingindia.in” असा संदेश दिसत आहे.

महाराष्ट्र अपडेट्स

  • उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने पुणे विभागाचा आढावा घेतला यावेळी कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण, कंटेन्मेन्ट झोनमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व आवश्यकतेप्रमाणे क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा, तसेच प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना उच्चस्तरीय केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉ. ए. के. गडपाले यांनी केल्या.
  • 678 नव्या केसेसह राज्यातील रुग्णसंख्या 12,974 झाली तर एकूण मृत्यू 548 आहेत. 441 नव्या केसेस आणि 21 मृत्यूसह मुंबईत संसर्गाने उचल खाल्ली. केवळ मुंबईतील रुग्ण संख्या 8800 वर पोहोचली आहे. 10,223 केसेससह मुंबई महानगर क्षेत्रामध्ये राज्यातील एकूण रुग्णांच्या 80 टक्के रुग्ण आहेत

 

FACT CHECK

 

* * *

DJM/RT/MC/SP/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1621015) Visitor Counter : 262