संरक्षण मंत्रालय
उमंग उप-क्षेत्राने कोरोना योद्धयांप्रति एकजुटीची भावना व्यक्त केली
Posted On:
03 MAY 2020 8:10PM by PIB Mumbai
नागपूर, 3 मे 2020
उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात सब एरियाने (उमंग) 03 मे 2020 रोजी नागपूरमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात कोविड -19 योद्धयांप्रति एकजुटीची भावना व्यक्त केली. पोलिस स्मारक, जीएमसी आणि आयजीएमसी रुग्णालये आणि अशा अन्य ठिकाणी डॉक्टर्स , परिचारिका, पोलिस, निमवैद्यकीय कर्मचारी , सफाई कामगार आणि देशातील जनतेच्या सेवेसाठी जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांसह सर्व आघाडीच्या कोविड -19 योद्धयांच्या सेवेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
सध्या सुरू असलेल्या कोरोना साथी दरम्यान पोलीस, सफाई कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचारी या आजाराविरूद्धच्या लढाईत कर्तव्यापलिकडे जाऊन काम करत आहेत. यासाठी ते या आघाडीवर बराच वेळ काम करत आहेत. उमंग उप-क्षेत्राने त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांच्या परीने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. नागपूरच्या कडक उन्हाळ्यात रस्त्यावर तैनात असलेल्या पोलिसांना सब एरियाकडून नियमित नाश्ता पुरवला जात आहे. उप-क्षेत्राने वेळोवेळी निराधारांना भोजन देखील पुरवले आहे.
कोविड-19 योद्ध्यांप्रति मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संरक्षण दलांच्या प्रमुखांनी (सीडीएस) 03 मे 2020 हा दिवस “एकता दिन” म्हणून पाळण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत उमंगने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. नागपूरच्या टाकळी मैदान येथील पोलिस स्मारकात पुष्पचक्र अर्पण करण्यात आले आणि मानवंदना देण्यात आली. उप-क्षेत्राने आयजीएमसीएच आणि जीएमसीएच या नागपूरमधील दोन कोविड रुग्णालयांच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सन्मानित केले. उमंग उप-क्षेत्राबरोबर काम करणाऱ्या नागरी सफाई कर्मचाऱ्यांनी या कठीण काळात त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांची दखल घेण्यात आली. उमंग उप-क्षेत्राचे एव्हीएसएम, एसएम, एसएम, एसएम, मेजर जनरल राजेश कुंद्रा यांनी सर्व कोरोना योध्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि आभार मानले आणि या साथीच्या रोगा विरूद्ध लढाईसाठी नागरी प्रशासनाला सर्व आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
YDGXPOHR.jpg)
03 मे 2020 रोजी पोलिस युद्ध स्मारक, टाकळी मैदान, नागपूर येथे पुष्पचक्र अर्पण करण्यात आले आणि मानवंदना देण्यात आली

03 मे 2020 रोजी रोजी नागपूरच्या कोविड रुग्णालयांमध्ये उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उप-क्षेत्राद्वारे रूग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि मिठाईचे वाटप

03 मे 2020 रोजी उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उप-क्षेत्राद्वारे नागपुरातील सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार
M.Jaitly/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1620764)
Visitor Counter : 242