संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाकडून गोव्यात कोरोना योद्ध्यांना सलाम
Posted On:
03 MAY 2020 10:05PM by PIB Mumbai
पणजी 3 मे 2020
देशभर कोरोना योद्ध्यांना भारतीय सैन्यदलाकडून मानवंदना देण्यात आली. त्याचाच भाग म्हणून गोव्यात नौदलाच्या आयएनएस हंसाने गोवा वैद्यकीय महाविद्यालय, कॉटेज हॉस्पीटल चिखली आणि ईएसआय हॉस्पीटल, मडगाव याठिकाणी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली.
नौदलाकडून कोरोना योद्ध्यांप्रती धन्यवाद व्यक्त केला तसेच या रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप केली.
कोरोना लढ्यात पोलिसांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल नौदलाने वास्को पोलीस ठाण्यात मिठाई वाटप केली. तसेच भारतीय नौदलाच्या आयएनएस हंसा येथील दाबोळी हवाईधावपट्टीवर 1500 नौदल कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी तयार करुन ‘इंडिया सॅल्युटस कोरोना वॉरिअर्स’ हा संदेश तयार केला.




R.Tidke/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
(Release ID: 1620785)
Visitor Counter : 63