नागरी उड्डाण मंत्रालय
लाईफलाईन उडान अंतर्गत चालवल्या गेल्या 430 विमानफेऱ्या
Posted On:
03 MAY 2020 7:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मे 2020
एअर इंडिया,अलायन्स एअर, भारतीय वायू दल आणि काही खाजगी विमानकंपन्यांनी मिळून लाईफलाईन उडानच्या 430 विमानफेऱ्या केल्या असून आतापर्यंत यापैकी 252 विमानफेऱ्या एअर इंडिया आणि अलायन्स एअर कार्गोने केल्या आहेत त्यातून 795.86 टन मालाची ने-आण करण्यात आली.या फेऱ्या नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने नियोजित केल्या असून त्यातून कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी लागणाऱ्या गरजेच्या वैद्यकीय वस्तूंची देशातील दुर्गम भागात नेआण केली गेली.आतापर्यंत लाईफलाईन उडान ने 4,21790 किलोमीटर हवाई अंतर पार केले आहे.
जम्मू काश्मीर, लडाख, बेटे तसेच देशाच्या ईशान्य भागात पवन हंस लिमिटेड कंपनीने हेलिकॉप्टरमधून महत्त्वाच्या वैद्यकीय वस्तूंची आणि रूग्णांची नेआण केली. 2 मे 2020 पर्यंत पवन हंस कंपनीने 7229 किलोमीटर अंतर पार करत 2.27 टन मालाची नेआण केली.देशाचा ईशान्य भाग,बेटांवर आणि डोंगराळ भागात माल पोहचवण्याकडे विशेष लक्ष दिले गेले. एअर इंडिया आणि भारतीय वायू दलाने एकत्रितपणे मुख्यत्वे जम्मू काश्मीर, लडाख आणि ईशान्य भारत आणि बेटांवर लक्ष केंद्रित केले.
स्पाईसजेट, ब्लूडार्ट, इंडीगो आणि विस्टारा या खाजगी मालवाहतूक सेवा व्यापारी तत्वावर मालवाहतूक करत आहेत. 24 मार्च ते 2 मे 2020 पर्यंत स्पाईसजेटने 760 फेऱ्यांमधे,13,09,301 किलोमीटर अंतर पार करून 5,519 टन मालाची नेआण केली. त्यापैकी २७९ फेऱ्या आंतरराष्ट्रीय होत्या.ब्लूडार्टने 25 मार्च ते 2 मे 2020 पर्यंत 253 फेऱ्यांमधे, 2,76,768 किलोमीटर अंतर पार करून 4,364 टन मालाची नेआण केली. त्यापैकी 12 फेऱ्या आंतरराष्ट्रीय होत्या. इंडीगो कंपनीने 3 एप्रिल ते 2 मे 2020 या कालावधीत 1,43,604 किलोमीटर अंतर पार करत 87 फेऱ्यात 423 टन मालाची नेआण केली, यापैकी 32 फेऱ्या आंतरराष्ट्रीय होत्या. विस्टारा कंपनीने 19 एप्रिल ते २ मे 2020 या कालावधीत ,20 फेऱ्यात 28,590 किलोमीटर अंतर पार करत ,139 टन मालाची नेआण केली. औषधे, वैद्यकीय साधनसामुग्री,आणि कोविड-19 सहाय्यक सामुग्रीची नेआण करण्यासाठी पूर्व आशिया सोबत मालवाहतूक पूल तयार केला होता. पूर्व आशियातून 899 टन माल एअर इंडियाद्वारे आणला गेला.
याव्यतिरिक्त ब्लूडार्टने 14 एप्रिल ते 2 मे 2020 पर्यंत गोआंगझाऊ आणि शांघाय येथुन 114 टन माल आणला.स्पाईसजेटने 2 मे 2020 पर्यंत शांघाय आणि गोआंगझाऊ येथून 204 टन वैद्यकीय साधनसामुग्री तर हाँगकाँग आणि सिंगापूर येथून 16 टन वैद्यकीय साधनसामुग्री आणली.
B.Gokhale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1620772)
Visitor Counter : 281
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Tamil
,
Telugu
,
Kannada