PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र


लॉकडाऊनच्या आधी कोविड-19च्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी दर 3 दिवस होता. गेल्या सात दिवसांत, हा दुप्पट होण्याचा दर 6.2 दिवस इतका झाला आहे: आरोग्य मंत्रालय

Posted On: 17 APR 2020 7:33PM by PIB Mumbai

Coat of arms of India PNG images free download    

नवी दिल्ली मुंबई, 17 एप्रिल 2020

''रिझर्व बँकेच्या आजच्या घोषणांमुळे तरलता मोठ्या प्रमाणात वाढेल आणि पतपुरवठ्यात सुधारणा होईल. या उपायांमुळे आपल्या लघूउद्योजकांना सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना, शेतकरी आणि गरिबांना मदत होईल. तसेच डब्ल्यूएमए मर्यादा वाढवल्याचाही सर्व राज्यांना लाभ होईल”, असे पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवर पत्रकार परिषद 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल, गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या श्रीमती पुण्य सलिला श्रीवास्तव आणि ICMR चे प्रवक्ते श्री रमन गंगाखेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत खालील माहिती दिली.

  • अनुसूचित जमाती आणि इतर आदिवासी वनजातींच्या लोकांना वनपरिसरात गौण वन उत्पादने/बिगर-लाकूड वन उत्पादने यांचे संकलन, उत्पादन आणि प्रक्रिया करण्यास लॉकडाऊनच्या निर्बंधातून सवलत देण्यात आली आहे - गृह मंत्रालय
  • टपाल विभागाने आतापर्यंत 100 टन औषधे आणि वैद्यकीय उपकरणे रुग्णालये आणि इतर संस्थांपर्यंत पोचवली आहेत.लॉकडाऊन च्या काळात विशेष उपाययोजना करत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय टपाल विभाग वस्तूंचा पुरवठा करत आहे.
  • लोकांना निवृत्तीवेतनाची रक्कम मिळावी आणि सरकारच्या इतर अत्यावश्यक कल्याणकारी योजनांचे पैसे मिळावेत यासाठी टपाल विभाग प्रयत्नशील आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अनेक प्रकारचे फायदे घरपोच पोहोचवले जात आहेत.
  • आतापर्यंत 1749 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. देशात कोविड19 च्या रुग्णांची एकूण संख्या 13,387 इतकी आहे. गेल्या 24 तासांत 1007 नवे रुग्ण मिळाले तर 23 जणांचा मृत्यू झाला आहे- आरोग्य मंत्रालय
  • लॉकडाऊनच्या आधी कोविड-19च्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी दर 3 दिवस होता. गेल्या सात दिवसांत, हा दुप्पट होण्याचा दर 6.2 दिवस इतका झाला आहे. 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात दुपटीचा दर देशाच्या सरासरी दरापेक्षा कमी आहे.
  • 1 एप्रिलपासून रुग्णाच्या सरासरी वाढीचे प्रमाण 1.2 आहे तर मार्च 15 ते मार्च 31 या दरम्यान सरासरी वाढीचे प्रमाण 2.1 होते. रुग्णांच्या प्रमाणात झालेली ही 40% घट SARI आणि ILI रुग्णांच्या चाचण्यांसह कोविड चाचण्यांमध्ये वाढ केल्यामुळे झाली आहे.
  • कोविड-19 च्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण आणि रुग्णांचा मृत्यू याच्या गुणोत्तराच्या संदर्भात भारत इतर अनेक देशांपेक्षा अधिक चांगले काम करत आहे. हे गुणोत्तर आणखी सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
  • 5 लाख जलद Antibody टेस्टिंग किटसचे वितरण जी राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये रुग्णांचे प्रमाण खूप जास्त आहे तिथे करण्यात येत आहे
  • लॉकडाउन-2 संदर्भात आणखी निर्देश देण्याबाबत चर्चा करण्यासाठी मंत्रीगटाची आज बैठक झाली. निदान, लस, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि इतर शुश्रूषा या संदर्भात विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थांच्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
  • CSIR, आणि आणि आण्विक ऊर्जा विभाग यांसारख्या संस्था चाचण्यांची क्षमता वाढवण्यावर काम करत आहेत. आमचा भर, नव्या, रॅपिड आणि अचूक निदान करणाऱ्या चाचण्या किट्स विकसित करण्यावर आहे. या किट्स मुळे केवळ अर्ध्या तासात निकाल करेल.
  • आम्ही viral sequencing आणि लस तयार करण्यासाठी देखील काम करत आहोत. प्रभावी लसीची निर्मिती करण्यासाठी भारत जागतिक भागीदारांसोबत काम करत आहे. या प्रक्रिया गतिमान करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
  • आम्हाला प्रभावी औषधे विकसित करण्यावर देखील काम करायचे आहे; आजतरी या आजारावर खात्रीशीर औषध नाही. कोविड19 विरुद्धच्या  बहुआयामी लढ्याचा भाग म्हणून रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पारंपरिक भारतीय वैद्यकशास्त्राचाही विचार सुरु आहे.
  • CSIRच्या प्रयोगशाळा स्वदेशी बनावटीचे PPEs, oxygen concentrators, ventilators आणि इतर पूरक उपकरणे तयार करत आहेत. स्वदेशी बनावटीचे RT-PCR kits आणि rapid antibody kits तयार करण्याचे काम सुरू आहे, मेपर्यंत प्रत्येक प्रकारच्या दहा लाख किट्सची निर्मिती करता येईल.
  • राज्यांना काही अनुमान काढणारी साधने देण्यात आली आहेत ज्यांच्या आधारावर रुग्णांची संख्या किती वाढेल याचा अंदाज घेऊन राज्ये कोविड समर्पित रुग्णालये आणि कोविड आरोग्य केंद्राची भविष्यात किती गरज आहे याचा अंदाज बांधून त्याप्रमाणे तयारी करु शकतात
  • सध्या देशात 1919 समर्पित कोविड-19 रुग्णालये आणि कोविड आरोग्य केंद्रे तयार करण्यात आली असून, त्यांची क्षमता 1.73 लाख खाटा आणि 21,800 अतिदक्षता बेड्स इतकी आहे
  • आतापर्यंत एकूण 3,19,400 चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल 28,340 चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 23,932 चाचण्या ICMR च्या 183 प्रयोगशाळामध्ये आणि उर्वरित, 4,408 चाचण्या 80 खाजगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात आल्या.
  • समर्पित कोविड हॉस्पिटल व्यतिरिक्त इतर ठिकाणी अनिवार्य शस्त्रक्रिया आणि आकस्मिक वैद्यकीय सेवा सुरू करण्याबाबत आम्ही राज्यांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. संसर्गाचा फैलाव कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे
  • आम्ही निरीक्षणासाठी #PooledTesting करण्याची शिफारस केली होती, ज्याचा उपयोग जिथे पॉझिटिव्ह रुग्णसंख्या कमी आहे, अशा भागात होऊ शकेल. आम्ही त्याची शिफारस व्यक्तिगत निदानासाठी केली नव्हती कारण व्यक्तिगत रुग्णांसाठी कदाचित ही चाचणी महाग ठरु शकेल- ICMR
  • नवीन कोरोना विषाणूच्या च्या देशात किती ठळक आभासी-प्रजाती आहेत, हे  समजण्यासाठी आणखी थोडा वेळ लागेल. मात्र, विषाणूच्या म्युटेशनमुळे लसीचा प्रभाव कमी होणार नाही, कारण- 1) विषाणूच्या सर्व उपप्रजातींमाध्ये एकच इंझाईम असते आणि 2) विषाणू इतक्या लवकर म्युटेट होत नाही.
  • कोविड-19 च्या विरोधातील लढ्यामध्ये BCG लस कितपत परिणामकारक ठरू शकेल याचा ICMR कडून अभ्यास करण्यात येणार आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष जोपर्यंत जाहीर होणार नाहीत व त्याबाबतचा  पुरावा मिळत नाही तोपर्यंत आम्ही या लसीचा वापर करण्याचा सल्ला आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील देणार नाही.    

वरील पत्रकार परिषदेचे @PIBMumbai ने केलेले लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Other updates:

 

महाराष्ट्र अपडेट्स

आज दुपारपर्यंत निदान झालेल्या 34 नव्या केसेससह महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 3236 झाली आहे. 3000 रुग्णसंख्येचा आकडा पार करणारे महाराष्ट्र काल पहिले राज्य ठरले होते. रुग्ण संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. मुंबईतील 166 धरून एकूण 295 लोक बरे झाले आहेत. परंतु राज्यात 194 मृत्यू देखील झाले आहेत जे देशातील मृत्युच्या 40% आहे.

 

***

DJM/RT/MC/SP/PK



(Release ID: 1615442) Visitor Counter : 269