• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
श्रम आणि रोजगार मंत्रालय

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या पॅकेजचा भाग म्हणून कर्मचारी भविष्य निर्वाह संस्था इपीएफओने 15 दिवसात कोविड-19 संबंधित 3.31 लाख दावे निकाली काढले


सुमारे 950 कोटी रुपयांचे वितरण

Posted On: 16 APR 2020 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 एप्रिल 2020


कोविड-19 महामारीच्या संकटात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या (पीएमजीकेवाय) पॅकेजचा भाग म्हणून ईपीएफ योजनेतून पैसे काढण्याची विशेष तरतूद 28 मार्च 2020 रोजी जाहीर करण्यात आली त्यामुळे देशातील कामगार वर्गाला वेळेवर दिलासा मिळाला आहे.

हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून, अवघ्या 15 दिवसांत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) 3.31 लाख दाव्यांवर प्रक्रिया करीत 946.49 कोटी रुपये वितरित केले आहेत. याव्यतिरिक्त या योजनेंतर्गत खाजगी कंपन्यांच्या पीएफ ट्रस्टमार्फत  284 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून त्यात टीसीएस कंपनी उल्लेखनीय आहे.

या तरतुदीनुसार, तीन महिन्यांचे मूलभूत वेतन आणि महागाई भत्ता मिळून जी रक्कम होईल ती किंवा सदस्याच्या ईपीएफ खात्यात जमा असलेल्या रकमेच्या 75% पर्यंतची रक्कम यापैकी जी कमी असेल ती रक्कम काढता येईल आणि ती रक्कम परत करण्याची आवश्यकता नाही. सभासद कमी रकमेसाठीही अर्ज करू शकतो. ही रक्कम मुदतीपूर्वी उचलली असली तरी त्यावर आयकर भरावा लागणार नाही.

या संकटकाळात ईपीएफओ आपल्या सदस्यांची सेवा करण्यास वचनबद्ध आहे, आणि ईपीएफओ कार्यालये संकटकाळात आवश्यक सेवा सुनिश्चित करण्यासाठी कार्यरत आहेत. लॉकडाऊनच्या कठीण  कालावधीत या सेवांच्या ऑनलाईन उपलब्धतेमुळे गरजू ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

 

B.Gokhale/V.Joshi/D.Rane



(Release ID: 1615138) Visitor Counter : 180


Link mygov.in