गृह मंत्रालय

लॉकडाउन निर्बंधामधून दुय्यम वन उत्पादने, वृक्ष लागवड, एनबीएफसी, सहकारी पतसंस्था आणि ग्रामीण भागामध्ये बांधकाम संबंधित काही उपक्रमांना सूट देण्याचा आदेश गृह मंत्रालयाकडून जारी

Posted On: 17 APR 2020 12:20PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 एप्रिल 2020

 

कोविड -19 विरोधातील लढ्यात देशव्यापी लॉकडाउनसंदर्भात गृह मंत्रालयाने (एमएचए) सर्व मंत्रालये / विभागांना एकत्रित सुधारित मार्गदर्शक सूचनांअंतर्गत काही विशिष्ट उपक्रमांना सूट देण्याचा आदेश जारी केला आहे.(https://www.mha.gov.in/sites/default/files/MHA%20order%20dt%2015.04.2020%2C%20with%20Revised%20Consolidated%20Guidelines_compressed%20%283%29.pdf)

आदेशात लॉकडाउन निर्बंधांमधून सूट दिलेले काही विशिष्ट उपक्रम पुढीलप्रमाणे :

- अनुसूचित जमाती आणि वनक्षेत्रात राहणाऱ्या अन्य लोकांद्वारे दुय्यम वन उत्पादने (एमएफपी) / लाकडांव्यतिरिक्त इतर वन उत्पादने (एनटीएफपी) गोळा करणे, कापणी आणि प्रक्रिया करणे.

-बांबू, नारळ, सुपारी, कोको, मसाल्यांची लागवड आणि त्यांची कापणी, प्रक्रिया, पॅकेजिंग, विक्री आणि विपणन.

- गृहनिर्माण वित्त कंपन्या (एचएफसी) आणि सूक्ष्म वित्त कंपन्यासह (एनबीएफसी - एमएफआय) बिगर-बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) किमान कर्मचाऱ्यांसह

- सहकारी पतसंस्था

- ग्रामीण भागात पाणीपुरवठा आणि स्वच्छता, विद्युत पारेषण लाइन टाकणे / उभारणे आणि दूरसंचार ऑप्टिकल फायबर तसेच केबल टाकणे आणि संबंधित अन्य कामांसह बांधकाम उपक्रम

 

आदेशाची प्रत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

U.Ujgare/S.Kane/P.Kor


(Release ID: 1615286) Visitor Counter : 288