• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 : संरक्षण मंत्र्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सज्जतेचा घेतला आढावा

Posted On: 16 APR 2020 6:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 एप्रिल 2020


कोरोना विषाणूचा  प्रसार रोखण्यासाठी देशभरातील 62 कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून (छावणी) करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाय-योजनांचा आढावा आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला. या महामारीविरुद्धच्या लढ्यात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बांधिलकीचे आश्वासन डिफेन्स इस्टेट्सच्या (डीजीडीई) महासंचालक श्रीमती दीपा बाजवा यांनी संरक्षण मंत्र्यांना दिले.

सर्व छावण्यांमध्ये सुरू असलेली कामे, स्वच्छताविषयक आवश्यक सेवांची देखभाल, वैद्यकीय सेवा आणि पाणीपुरवठा याविषयीची माहिती बाजवा यांनी यावेळी दिली. विलगीकरण कक्षासाठी रुग्णालये, शाळा आणि सामुदायिक सभागृहांच्या उपलब्धतेविषयीची माहिती आणि सामाजिक अंतराबाबतच्या नियमांविषयी तेथील रहिवाश्यांमध्ये सुरु असलेल्या जनजागृतीबाबतही त्यांनी माहिती दिली. स्वयंसेवी संस्था / सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने असुरक्षित घटकांसाठी अन्न पदार्थ आणि धान्याची तरतूदही करण्यात आली आहे तसेच या छावण्यांचे  मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा प्रशासन आणि स्थानिक सैन्य प्राधिकरणांशी (एलएमए) नियमित संपर्क साधत आहेत, असेही बाजवा यांनी संरक्षण मंत्र्यांना सांगितले.

राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) कॅन्टोन्मेंट बोर्डाना देण्यासंबंधी संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांनी मुख्य सचिवांकडे हे प्रकरण मांडले असल्याचेही संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले. कॅन्टोन्मेंट बोर्डाने विशेषत: लोकसंख्या असलेल्या नागरी भागात स्वच्छता, आरोग्य आणि धुळीचे उच्च मापदंड सुनिश्चित केले पाहिजेत, असे आग्रही प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केले. स्थलांतरित / रोजीरोटीवरील असुरक्षित घटकांना अन्न आणि निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे यावर त्यांनी भर दिला.

 

 

U.Ujgare/V.Joshi/D.Rane


(Release ID: 1615074) Visitor Counter : 260


Link mygov.in