• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत (पीएमजीकेवाय) पीएमयुवाय लाभार्थ्यांना आतापर्यंत 1.25 कोटींहून अधिक एलपीजी सिलेंडर वितरीत केले


धर्मेंद्र प्रधान यांनी एलपीजी वितरक कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा आणि परिश्रमांचे कौतुक करत त्यांना आघाडीचे सैनिक संबोधले

काही एलपीजी वितरक कर्मचाऱ्यांनी पीएम केअर्स निधीत दिले योगदान

Posted On: 16 APR 2020 9:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 एप्रिल 2020

 

या महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत (पीएमजीकेवाय) पीएमयुवाय लाभार्थ्यांना आतापर्यंत 1.25 कोटींहून अधिक एलपीजी सिलेंडर वितरीत केले आहेत. गरीब जनतेच्या कल्याणासाठी पीएमजीकेवाय अंतर्गत केंद्र सरकारने अनेक मदत उपाययोजना जाहीर केल्या आहेत आणि एप्रिल ते जून 2020 या कालावधीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (पीएमयूवाय) 8 कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना 3 एलपीजी सिलिंडर्स (14.2 किलो) विनामूल्य प्रदान करणे हा या योजनेतील एक महत्त्वाचा घटक आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तेल विपणन कंपन्या पीएमयूवाय ग्राहकाच्या लिंक केलेल्या बँक खात्यात पॅकेजच्या प्रकारानुसार 14.2  किलो रिफिल किंवा 5 किलो रिफिलच्या आरएसपी प्रमाणे आगाऊ रक्कम हस्तांतरित करीत आहेत. एलपीजी सिलेंडर घेण्यासाठी ग्राहक या पैशाचा उपयोग करू शकतात. तेल विपणन कंपन्या दररोज 50 ते 60 लाख सिलेंडर वितरीत करत आहेत, ज्यामध्ये पीएमयुवाय लाभार्थ्यांच्या 18 लाख सिलेंडरचा समावेश आहे.

नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान आज 800 हून अधिक एलपीजी सिलेंडर वितरक कर्मचाऱ्यांसोबत वेबिनार मध्ये सहभागी झाले यामध्ये नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्रालयाचे सचिव, नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्रालयाचे अधिकारी आणि तेल विपणन कंपन्या देखील सहभागी झाल्या होत्या.  कोविड-19 साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व परिस्थीत काम करत असलेल्या एलपीजी वितरक कर्मचाऱ्यांना आघाडीचे सैनिक आणि कोरोना योद्धे संबोधित प्रधान म्हणाले की, संपूर्ण देश त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात ठेवेल. कामाप्रती असलेला त्यांचा प्रामाणिकपणा, परिश्रम आणि समर्पणाचे कौतुक करत प्रधान म्हणाले, या अशा काळात ते दररोज प्रसंगी त्यांचा जीव धोक्यात घालूनही 60 लाखांपर्यंत सिलेंडर वितरीत करत आहेत. प्रधानांनी त्यांना कर्तव्य बजावताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, या कठीण काळात आपले कर्तव्य बजावताना त्यांना समाजाकडून विशेष आदर मिळाला आहे, आणि गरिबांकडून त्यांना आशीर्वाद मिळत आहेत.

अनेक एलपीजी वितरक कर्मचाऱ्यांनी या कठीण काळातील त्यांचे अनुभव यावेळी सांगितले. त्यांनी सांगितले की कंपन्यांनी त्यांना संरक्षण संच उपलब्ध करुन दिले आहे ज्यात साबण, सॅनिटायझर, मास्क आणि हातमोजे आहेत. सिलिंडर देण्यापूर्वी ते स्वच्छ करतात आणि सिलिंडर वितरीत करताना सामाजिक अंतर देखील राखतात. त्यांच्यापैकी बर्‍याच जणांनी सांगितले की, ते ग्राहकांना सामाजिक अंतर, त्यांच्या फोनमध्ये आरोग्य सेतु घेण्याचा फायदा आणि डिजिटल पद्धतीने पैसे देण्याविषयी जागरूक करीत आहेत. त्यांच्यापैकी बहुतेकांनी त्यांच्यासाठी विमा दिल्याबद्दल सरकारचे आणि ओएमसीचे आभार मानले. काही वितरक कर्मचाऱ्यांनी असेही सांगितले की त्यांनी पीएम-केअर निधीत योगदान दिले आहे तसेच त्यांचे कर्तव्य बजावत असताना गरीब आणि वृद्धांना मदत करीत आहेत.

 

 

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane


(Release ID: 1615190) Visitor Counter : 213


Link mygov.in