PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 27 NOV 2020 7:55PM by PIB Mumbai

Coat of arms of India PNG images free download  

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

दिल्ली-मुंबई, 27 नोव्हेंबर  2020

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संविधान दिवस सोहळ्याचे दूरस्थ पद्धतीने उद्‌घाटन केले. संविधान स्वीकाराचा 71 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी, 26 नोव्हेंबर 2020 ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या सोहळ्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाने या महामारीच्या दिवसातही आपले कार्य सुरू ठेवून न्यायदान केले. यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तसेच ई-फायलिंग सारख्या तंत्रज्ञानाची मदत त्यांनी घेतली.

 

उपराष्ट्रपती  एम. वेंकैया नायडू यांनी आज डिजिटल साक्षरतेला चालना देण्यासाठी व्यापक जनआंदोलन सुरु करण्याचे आणि सर्व तंत्रज्ञान व शैक्षणिक संस्थांनी त्या प्रयत्नात अग्रगण्य भूमिका बजावण्याचे आवाहन केले. आदि शंकराचार्य यांचे जन्मस्थान असलेल्या कालादी  येथे आभासी पद्धतीने ‘आदि शंकराचार्य डिजिटल अकादमी’ चे उद्घाटन करताना उपराष्ट्रपती बोलत होते. कोविड -19 साथीच्या आजारामुळे होणाऱ्या अभूतपूर्व अडचणींकडे लक्ष वेधताना नायडू म्हणाले की शाळा बंद पडल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना वर्गात बसून शिक्षण घेता येत नाही आणि ऑनलाईन शिक्षण स्वीकारून जागतिक समुदाय या आव्हानाला तोंड देण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी तीन शहरांचा दौरा करणार आहेत. ते अहमदाबादमधील झायडस बायोटेक पार्क, हैदराबादमधील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देणार आहेत.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तिसऱ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूक बैठक आणि एक्सपो (री-इन्व्हेस्ट 2020) चे उद्‌घाटन केले. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा  मंत्रालयाने ही  शिखर परिषद आयोजित केली आहे. ‘शाश्वत ऊर्जा संक्रमणासाठी नवसंशोधन ’ ही री -इन्व्हेस्ट  2020 ची संकल्पना   आहे.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

भारताची सक्रीय रुग्णसंख्या आज 4,55,555 झाली. भारतातील एकूण बाधित रुग्णसंख्येच्या तुलनेत सक्रीय रुग्णसंख्या 4.89%.आहे.

सक्रीय रुग्णसंख्येपैकी 70% (69.59%) रुग्णसंख्या ही 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहे. ही राज्ये म्हणजे महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, राजस्थान, उत्तरप्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढ़.

आज महाराष्ट्रातील एकूण सक्रीय कोविड रुग्णसंख्या सर्वाधिक म्हणजे 87,014 आहे, त्या खालोखाल केरळातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या 64,615  तर दिल्लीतील एकूण सक्रीय रुग्णसंख्या 38,734 आहे.

गेल्या 24 तासात भारतात 43,082 नवीन कोविड रुग्ण नोंदवले गेले. यापैकी 76.93% हे 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

गेल्या 24 तासात, महाराष्ट्रात सर्वाधिक 6,406 नवीन कोविड रुग्ण नोंदवले गेले. त्या खालोखाल दिल्लीत 5,475, तर केरळात 5,378 नवीन कोविड रुग्ण नोंदवले गेले.

भारतातील एकूण बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने 87लाखांचा आकडा (87,18,517) ओलांडला. रोगमुक्तांच्या संख्येचा राष्ट्रीय दर आज 93.65% राहिला.

देशात गेल्या 24 तासात  39,379 जण बरे झाल्याचे नोंदवले गेले. या बरे झालेल्यांच्या संख्येपैकी 78.15% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहे.

एका दिवसातील नव्याने बरे झालेल्यांची संख्या केरळात सर्वाधिक म्हणजे 5,970, तर दिल्लीत 4,937 आणि महाराष्ट्रात त्याखालोखाल 4,815 आहे.

गेल्या 24 तासात झालेल्या 492 कोविड मृत्यूंपैकी 75.20% हे दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

दिल्लीत सर्वाधिक म्हणजे 91 नवीन मृत्यूसंख्येची नोंद झाली, तर महाराष्ट्रात 65 नवीन मृत्यूसंख्येची नोंद आणि त्या खालोखाल पश्चिम बंगालमध्ये 52 मृत्यू नोंदवले गेले.

 

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन, यांनी आरोग्य मंत्रालयाच्या मुख्य योजना, “आयुष्मान भारत- पंतप्रधान जन आरोग्य योजना (एबी पीएम-जेएवाय) आणि राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाच्या (एनडीएचएम)” यांच्या अंमलबजावणीचा उच्च स्तरीय आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) ला भेट दिली.  केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी विविध अधिका-यांशी संवाद साधून  दोन्ही योजनांच्या अंमलबजावणीचा संपूर्ण आढावा घेतला.

 

इतर अपडेट्स:

 

महाराष्ट्र अपडेट्स:

महाराष्ट्रात, नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात ज्या ठिकाणी चाचणी घेण्यात आली होती, त्यांच्याकडून कोविड चाचण्यांचा अहवाल मागविला आहे. कोविड चाचणी न घेतलेल्या लोकांची नावे चुकीच्या पद्धतीने समाविष्ट केल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी हे निर्देश जारी केले. नवी मुंबईत कोविड चाचणी अहवालाच्या संकलनातील अनियमितता उघडकीस आल्या असून, ज्या लोकांनी चाचण्या घेतल्या नाहीत त्यांना कोविड निगेटिव्ह ठरविण्यात आले आहे. कोविड पॉझिटिव्ह रूग्णांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अंतर्गत वर्गात या लोकांची नावे नोंदविली गेली आहेत.

 

FACT CHECK

Image

Image

 

* * *

R.Tidke/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1676546) Visitor Counter : 162