अर्थ मंत्रालय

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या भांडवली खर्चाला चालना देण्यासाठीच्या 5 व्या आढावा बैठकीचे केले आयोजन

Posted On: 27 NOV 2020 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 नोव्‍हेंबर 2020


केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज या आर्थिक वर्षातील भांडवली खर्चाचा (सीएपीईएक्स) आढावा घेण्यासाठी ऊर्जा, खाण आणि अणु ऊर्जा विभाग मंत्रालयांचे सचिव आणि या मंत्रालयातील 10 केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे (सीपीएसई) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी)  यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली. कोविड – 19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आर्थिक विकासाला गती देण्यासाठी अर्थमंत्री विविध भागधारकांसमवेत घेत असलेल्या बैठकींच्या मालिकेतील ही पाचवी बैठक आहे.

वर्ष 2020-21 च्या 61483 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाच्या तुलनेत 23 नोव्हेंबर 2020 पर्यंत 24227 कोटी (39.4%) रुपयांची एकूण कामगिरी झाली आहे.  

सीपीएसईच्या कामगिरीचा आढावा घेताना सीतारमण म्हणाल्या की सीपीएसईंनी केलेला भांडवली खर्च हा आर्थिक विकासाचा महत्वपूर्ण प्रेरक आहे आणि आर्थिक वर्ष 2020-21 आणि 2021-22 पर्यंत यामध्ये वृद्धी होणे  आवश्यक आहे. मंत्रालय आणि सीपीएसई यांनी भांडवली खर्चाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत त्याचे अर्थमंत्र्यांनी कौतुक केले. तथापि, सीतारमण यांनी तिसऱ्या तिमाहीतील 75% भांडवली खर्च आणि आर्थिक वर्ष 21 मधील चौथ्या तिमाही पर्यंत 100 टक्क्यापेक्षा  जास्त लक्ष्य गाठण्यासाठी अजून प्रयत्न करणे आवश्यक आहे असे सांगितले. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि 2020-21 वर्षासाठी देण्यात आलेला भांडवली खर्च योग्य आणि वेळेत खर्च हे सुनिश्चित करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी सीपीएसईंना प्रोत्साहित केले.

भांडवली खर्चाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आणि त्यासाठी योजना आखण्यासाठी सीतारमण यांनी सीपीएसईंच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवण्यास तसेच सीपीएसईंच्या प्रलंबित प्रश्नाचे निराकरण करण्याच्या सूचना सचिवांना दिल्या.

 

 
* * *

G.Chippalkatti/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1676470) Visitor Counter : 231