आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ. हर्षवर्धन यांनी आयुष्मान भारत - पीएमजेवाय आणि राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन (एनडीएचएम) च्या अंमलबजावणीचा घेतला आढावा
Posted On:
26 NOV 2020 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 26 नोव्हेंबर 2020
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन, यांनी आज आरोग्य मंत्रालयाच्या मुख्य योजना, “आयुष्मान भारत- पंतप्रधान जन आरोग्य योजना (एबी पीएम-जेएवाय) आणि राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाच्या (एनडीएचएम)” यांच्या अंमलबजावणीचा उच्च स्तरीय आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) ला भेट दिली. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी विविध अधिका-यांशी संवाद साधून दोन्ही योजनांच्या अंमलबजावणीचा संपूर्ण आढावा घेतला.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली 130 कोटी नागरीकांना त्यांना जिथे हवी तिथे वेळेवर, परवडणारी, सुरक्षित आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान सुरु केले आहे. एनडीएचएम देश-व्यापी डिजिटल आरोग्य प्रणाली तयार करून आरोग्यसेवेचे आरोग्यसेवेचे डिजिटलीकरण करेल ज्यामुळे रूग्णांना त्यांच्या आरोग्याच्या नोंदी डॉक्टरांना आणि त्यांच्या पसंतीच्या आरोग्य सुविधांमध्ये सामायिक करण्यास मदत होईल”, असे डॉ. हर्ष वर्धन म्हणाले .
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदू भूषण यांनी यावेळी मंत्री महोदयांना एनडीएचएम अर्थात देश-व्यापी डिजिटल आरोग्य प्रणाली मध्ये असलेल्या हेल्थ आयडी, डिजीडॉक्टर, आरोग्य सुविधा रेजिस्ट्री, ई-हॉस्पिटल, रुग्णांच्या आरोग्य नोंदी आणि संमती व्यवस्थापक- आदी सोयीसुविधांचे संपूर्ण प्रात्यक्षिक दिले.
“आज मी एनडीएचएमचा आढावा घेतला आणि मला आनंद होत आहे की तीन महिन्यांतच अभियानाने चंदिगड, अंदमान आणि निकोबार,दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, लदाख, लक्षद्वीप आणि पुडुचेरी या सहा केंद्रशासित प्रदेशात मार्गदर्शक प्रकल्पामध्ये उल्लेखनीय प्रगती केली असून लवकरच राष्ट्रीय स्तरावर याची अंमलबजावणी केली जाईल असे डॉ. वर्धन आपली निरीक्षणे नोंदवताना म्हणाले. नागरिक आणि वैद्यकीय व्यावसायिका दोघांसाठी आवश्यक ती गोपनीयता आणि सुरक्षितता या प्रणालीत आहे आणि रूग्णांचे चाचणी अहवाल, चाचणी, प्रिस्क्रिप्शन आणि निदान अहवाल यांची संमती-आधारित देवाणघेवाण रुग्ण आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर यांच्यात होऊ शकेल, रुग्णांना त्यांचे आरोग्यविषयक दस्तावेज जतन करणे सोईचे ठरेल आणि त्याद्वारे पुढील उपचार घेण्याची ,फॉलो अप ची प्रक्रिया सुरळीत होईल.
ते पुढे म्हणाले की, एनडीएचएममधील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे डिजिटल विभागामध्ये संपूर्ण देशभर पसरलेल्या भारतीयांच्या वास्तवाविषयी विचार केला आहे . स्मार्ट फोन शिवाय लाखो नागरिकांना किंवा दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना कनेक्टिव्हिटीशिवाय ऑफलाइन मोड्यूल्सद्वारे आरोग्य सेवा मिळवून देण्यास “देश-व्यापी डिजिटल आरोग्य प्रणाली” मदत करेल.
एनडीएचएम अर्थात देश-व्यापी डिजिटल आरोग्य प्रणाली ही सोप्या पद्धतीने आरोग्य सेवा डेटा उपलब्ध करून कार्यक्षमता, प्रभावीपणा आणि भारतातील आरोग्य सेवा पुरविण्याच्या पारदर्शकतेत सुधारणा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणारी प्रणाली आहे. आरोग्याशी संबंधित वैयक्तिक माहितीची सुरक्षा, गोपनीयता सुनिश्चित करतांना विविध प्रकारचा डेटा, माहिती आणि पायाभूत सुविधा सेवांच्या योग्य तरतूदीद्वारे, खुली, आंतर-व्यवहारक्षम, प्रमाण आधारित डिजिटल प्रणालीच्या तरतूदीद्वारे एक राष्ट्रीय डिजिटल आरोग्य व्यवस्था तयार केली जाईल.एनडीएचएम अर्थात देश-व्यापी डिजिटल आरोग्य प्रणाली ने हेल्थ आयडी, डॉक्टर आणि आरोग्य सुविधांसाठी अनन्य ओळख, वैयक्तिक आरोग्य नोंदी आणि टेलिमेडिसिन आणि ई-फार्मसीसह इतर घटकांसह राष्ट्रीय डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.
यावर्षी 23 सप्टेंबर रोजी दोन वर्षे पूर्ण झालेल्या आयुष्मान भारत पीएम-जेएवायच्या अंमलबजावणीचा आढावा देखील आरोग्यमंत्र्यांनी घेतला. या योजनेच्या प्रगतीचे कौतुक करताना डॉ वर्धन म्हणाले, “मला हे जाणून आनंद झाला की, या अभूतपूर्व काळात आयुष्मान भारत पीएम-जेएवाय अंतर्गत गरीब नागरिकांना 17,500 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या 1.4 कोटी पेक्षा जास्त कॅशलेस उपचाराची तरतूद करण्यात आली आहे. साथीच्या आजाराचा प्रकोप सर्वात अधिक असतानाही, गंभीर स्वरूपाच्या आजारांकडे दुर्लक्ष होऊ नये याची काळजी सरकार घेत आहे आणि अशा आजारांसाठी आवश्यक असणारी आरोग्यसेवा प्रदान करण्याची काळजी घेण्यात आली आहे. यामुळे लोकांच्या जवळपास 35,000 कोटी रुपयांची बचत झाली आहे. आम्हाला याची जाणीव आहे की हे आरोग्य विमा आणि त्याचे वितरण हे साथीच्या आजाराच्या तीव्र तणावाखाली सापडलेल्या कोट्यावधी कुटुंबांसाठी सहाय्य आणि सुरक्षिततेचा एक विशाल स्त्रोत आहे. ”
एबी-पीएमजेवायची प्रगती (26 नोव्हेंबर 2019 पर्यंत)
- सध्या 32 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात पीएमजेएवाय योजना राबविली जात आहे
- या योजनेंतर्गत एकूण 1.4 कोटी रुग्ण रूग्णालयात दाखल झाले.
- एकूण 1,535 कोटी रुपये खर्चाच्या रूग्ण भरतींना मान्यता
- या योजनेत एकूण 24,653 रुग्णालये सूचीबद्ध (सरकारी व खासगी रुग्णालयांचे प्रमाण 54:66)
- ई-कार्ड जारी: 12.7 कोटी
- पोर्टेबिलिटीची प्रकरणे : 1.5 लाख
- दर मिनिटाला 14 रूग्णांना रुग्णालयात दाखल केले जाते
- प्रति मिनिट 13 लाभार्थ्यांची पडताळणी
- या योजनेत दररोज 8 नवीन रुग्णालये जोडली जातात
Jaydevi P.S/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1676244)
Visitor Counter : 417