वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पियुष गोयल यांनी जड-जवाहीर उद्योगाच्या पुढील प्रगतीसाठी पुनर्विचार करण्याच्या, पुन्हा दिशा निश्चित करण्याच्या आणि आराखडा तयार करण्याच्या गरजेवर भर दिला
Posted On:
26 NOV 2020 8:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 26 नोव्हेंबर 2020
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज सांगितले की, जड-जवाहीर उद्योगाला स्वावलंबी होण्यासाठी आपल्या पद्धती आणि प्रक्रियेवर पुनर्विचार करण्याची, पुन्हा दिशा निश्चित करण्याची आणि आराखडा आखण्याची आवश्यकता आहे. दागिन्यांमधील आत्मनिर्भरता: खाणकाम, वस्तुनिर्माण आणि विपणन या विषयावरील सीआयआयच्या डिजिटल जड-जवाहीर परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले जड-जवाहीर क्षेत्र, गुणवत्ता आणि शुल्क प्रतीस्पर्धेविषयी जागरूकता निर्माण करून अमेरिका, आखाती देश, रशिया, सिंगापूर, हाँगकाँग इत्यादी बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यास मदत करेल आणि भारताने आज त्याच्या दागिन्यांमध्ये आणलेल्या आकर्षकतेमुळे जड-जवाहीरांसाठी जगभर ओळख निर्माण केली आहे.
गोयल म्हणाले की कोविड साथीच्या आजाराने देशाच्या निश्चयाची परीक्षा घेतली आणि जड-जवाहीर क्षेत्राला मोठा फटका बसला. परंतु, ते पुढे म्हणाले की, या क्षेत्राची अलीकडील निर्यात आणि देशांतर्गत आकडेवारी ने हे दर्शविले आहे की पुनरागमन करण्यासाठी या उद्योगाने नवोन्मेष, कल्पकता आणि नवीन सामान्यतेचा अवलंब केला आहे. “जर आपण आपली सचोटी टिकवून ठेवली तर आपण आपली बाजारपेठ विस्तृत करून भारत जगाच्या सर्व गरजा पूर्ण करू शकेल यात कोणतीही शंका नाही. यात तंत्रज्ञान, नवीन उपक्रम आणि कौशल्य विकास यांचा समावेश असेल.”
यशाचे शिखर आणि जागतिक व्यापार व भारतातील उद्योगांना योग्य स्थान मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नात सरकारद्वारे संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देत गोयल यांनी असे नमूद केले की उद्योगात एमएसएमईला कसे सहाय्य करता येईल हे जाणून घेण्यासाठी सरकार उद्योगाशी चर्चा करत आहे. “जड-जवाहीर क्षेत्रातील बहुतेक उद्योग एमएसएमई आहेत. आम्हाला विपणन, पॅकेजिंग लॉजिस्टिक आणि कमी किमतीच्या वित्तपुरवठ्यात त्यांचे प्रयत्न वाढविण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे.
मंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, "मेक इन इंडिया नाही तर मेक फॉर वर्ल्ड साठी तयार होण्याची वेळ आली आहे."
गोयल यांनी गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवण्यावर भर दिला आणि ते म्हणाले की, विविध क्षेत्रांमधील भारताची गुणवत्ता आणि उच्च उत्पादकता या प्रतिबद्धतेचा संदेश पुढे नेला पाहिजे.
अर्थव्यवस्थेत या क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार करीत गोयल म्हणाले की देशाच्या निर्यातीत हे क्षेत्र देशाच्या जीडीपीच्या सुमारे 7.5 %, देशाच्या निर्यातीच्या 14% योगदान देते आणि 5 दशलक्षाहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करुन देते.
गोयल म्हणाले की कर्तव्ये, सेझ, कर परतावा, रसद, वित्तपुरवठा इत्यादी क्षेत्रातील विविध सूचनांचा विचार केला जात आहे.
M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1676202)
Visitor Counter : 131